-->

Ads

अंबरनाथकराने थायलंडमध्ये मारली धडक..!


 मा.नगरसेवक श्री.सुभाष साळुंके यांनी केला अक्षय गायकवाड यांचा केला हृदयस्पर्शी सत्कार...!

अंबरनाथ 

श्री अक्षय नरेंद्र गायकवाड, ताडवाडी-वडवली विभागात राहत असून ठाणे येथे टिजेएसबी बँकेत काम करीत आहे.आपली नाट्यसंगीत गायनाची आवड जपण्याचा प्रयत्न केला असून  थायलंड येथे आखिल भारतीय सांस्कृतिक संघ आणि युनेस्को यांच्या विद्यमाने आयोजित जागतिक स्पर्धेत सहभाग घेतला.

ABSS च्या ग्लोबल कौन्सिल ऑफ आर्ट अँड कल्चर ऑफिशियलने आयोजित केलेल्या  १२व्या कल्चरल ऑलिम्पियाड ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये आंतरराष्ट्रीय गायन स्पर्धेत श्री.अक्षय गायकवाड यांस कांस्य पदक मिळाले.




अंबरनाथ शहर हे गायन - कला -संस्कृतीचे शहर आहे,हे सिद्ध होत आहे, अक्षय चे कौतुक व अभिनंदन श्री. सुभाष साळुंके, मा.नगरसेवक (शिवसेना सोलापूर संपर्क प्रमुख, पक्ष निरीक्षक- परभणी, द.म.मुंबई) यांनी शिवसेना कार्यकर्त्यांसह घरी जाऊन केले. यावेळी संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ.सुवर्णा साळुंके,सौ.मनीषा मसने, सौ.सुनंदा मांढरे, सौ.पालकर काकी, निलेश चौधरी,चंद्रकांत फाळके इ. उपस्थित होते.,

 याप्रंसगी अक्षयने स्पर्धेत गायलेले नाट्यसंगीत गायन सादर केले .

Post a Comment

0 Comments