-->

Ads

कृष्णराव भेगडे बी.फार्मसी महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांमध्ये राज्य स्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासूट्टिकल एज्युकेशन अँड रिसर्च आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या शोधक वृत्तीला, कल्पकतेला वाव मिळावा यासाठी अविष्कार या स्पर्धेचे आयोजन दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात आले होते.

 


या स्पर्धेचे उदघाटन इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष. मा. श्री. रामदास काकडे यांनी केले. संशोधन आणि संशोधकांचे महत्व दैनंदिन जीवनात आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी किती महत्वाचे आहे हे अध्यक्षानी विविध उदाहरणे देऊन पटवून दिले. यावेळेस कार्यवाह मा. श्री. चंद्रकांत शेटे उपस्थित होते. संस्थेच्या विश्वस्त व उद्योजिका सौ. निरूपा कानिटकर मॅडम आणि  प्राचार्य डॉ. संजय आरोटे  यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. संजय खोब्रागडे सर उपस्थित होते. यांनी देखील विद्यापीठाच्या माध्यमातून किती संशोधक होऊन गेलेत आणि ते आता इस्रो सारख्या मोठ्या संस्थेत आज संशोधक म्हणून काम करत आहे याचा अभिमान वाटत आहे असे सांगितले आणि अविष्कार स्पर्धेतून मुलांना पुढे झेप घेण्याची उत्कृष्ठ संधी आहे, त्याचा स्पर्धाकांनी फायदा करून घ्यावा . कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन महाविद्यालये आविष्कार समन्वयक डॉ. योगेश झांबरे आणि डॉ. मयुरी गुरव यांनी केले.

अविष्कार स्पर्धेत 191 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातील ३६ स्पर्धकांची  पुढील अविष्कार  फेरी साठी  निवड झाली. कृष्णराव भेगडे महाविदलयातील  प्रथम वर्ष एम. फार्मसी पदवीयुत्तर शिक्षण घेणारी कु. शिवांजली शिंदे हिने देखील सुवर्ण पदक मिळवून अविष्कारच्या पुढील फेरीत पदार्पण केले. यावेळेस इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे सर , डी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गुलाब शिंदे सर,  डॉ. आर. जे. पाटील सर, श्री. गोरख काकडे (मुख्य क्रीडासमन्वयक) तसेच अविष्कार स्पर्धेसाठी सहभागी विद्यार्थी त्यांचे मार्गदर्शक, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गणेश म्हस्के आणि डॉ. श्रीभवानी राकेश यांनी केले. याप्रसंगी विद्यापीठाने संस्थेला, प्राचार्यांना आणि समन्वयकांना मानचिन्हे व सर्टिफिकेट देऊन सन्मानित केले.

Post a Comment

0 Comments