-->

Ads

पुसद येथे भारतीय आदिवासी पँथर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने केला सविधान दिन साजरा

 


यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर : संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.[१] त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.[४][५] महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.[

[ संविधान संरक्षण करणे व जाणगृति करण्याच्या उद्देशाने आपल्या पुसद शहरात त्यानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक

शामराव व्यवहारे

रामकृष्ण चौधरी

नारायण कराळे

भगवान डाखोरे

नवनिर्वाचित आदि. सेवक  शिरडे हे व मा. माधवराव वैद्य साहेब माजी समाज कल्याण आयुक्त तसेच  तालुक्यातील आदिवासी संघटेनेचे सर्व अध्यक्ष व धडाडीचे कार्यकरते उपस्थितीत होते. यामध्ये  रंगराव काळे साहेब, (माजी. शि.अ.) गणपत गव्हाळे, पांडुरंग व्यवहारे, मारोती भस्मे, राजेश ढगे,लक्ष्मण टारफे, संदीप व्यवहारे व आदिवासी सरपंच यांचा सत्कार घेण्यात आला. सत्कार्याला वाव मिळावा त्यादृष्टीने संविधान दिनाचे औचित्य साधून  सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

हा कार्यक्रम भारतीय आदिवासी पँथर संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. संभाजी सरकुंडे साहेब, माजी सनदी अधिकारी (आयुक्त) यांची उपस्थितीती लाभली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या व  समाजातील बेलोरा येथील धनवे व काळी येथील वैद्य यांच्या दुःखद निधनाप्रती भावपुर्ण श्रद्धांजली अर्पित केली.

 

आयो. श्री देविदासजी  डाखोरे ( भा.आदि.पँथर संघटना जिल्हाध्यक्ष यवतमाळ)  तसेच हरिदास बोके सर, यवतमाळ जिल्हा संघटक ज्ञानेश्वर मेटकर जिल्हाउपाध्यक्ष, रंगराव व्यवहारे जिल्हा सचिव, सुरेश धनवे सर सल्लगार(महा.),  ऍड.संदिप कोठुळे, चिरमाडे सर राघोजी कुरकुटे, सुदाम चिरंगे यांच्या मार्गदर्शनात पार पडला. कार्यकरमाचे संचलन उमाटे सर तर आभार ऍड. कोठुळे  साहेब यांनी मानले.

Post a Comment

0 Comments