-->

Ads

रेल्वे ट्रॅकवर ट्रक उभा करुन चालक फरार; काही मिनिटांत एक्स्प्रेस सुस्साट वेगात आली अन्...

मद्यधुंद अवस्थेतील चालकानं रेल्वे रुळांवर ट्रक दामटवला. जवळपास १ किलोमीटर अंतर कापल्यावर ट्रक रुळांमध्ये अडकला. त्यानंतर चालक तिथून फरार झाला. काही मिनिटांत तिथून एक्स्प्रेस जाणार होती.


चंदिगढ: पंजाबच्या लुधियानामध्ये रुळांवरुन ट्रेन जाण्याच्या काही मिनिटांपूर्वी मद्यधुंद अवस्थेतील चालकानं ट्रक रुळांवर आणून उभा केला. यानंतर तो तिथून पळून गेला. याची माहिती मिळताच ट्रेनच्या चालकानं ट्रेनचा वेग कमी केला. त्यानं ट्रेन ट्रकपासून काही अंतरावर थांबवली आणि मोठा अपघात टळला

रेल्वे पोलिसांचे तपास अधिकारी जसवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालकानं रात्रीच्या सुमारास लुधियाना-दिल्ली रेल्वे रुळांवर वाहन नेलं. त्यानं जवळपास एक किलोमीटर अंतर कापलं. तो रुळांवर ट्रक दामटवत होता. शेरपूरहून लुधियाना रेल्वे स्थानकाच्या दिशेनं जात असताना ट्रक रुळांमध्ये
अडकला.

चालकानं रुळांमध्ये अडकलेला ट्रक काढण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्याला यश आलं नाही. तो ट्रक तिथेच सोडून पळून गेला. स्थानिकांनी रेल्वे रुळांवर उभा असलेला ट्रक पाहिला. काही वेळातच रुळांवरुन गोल्डन टेम्पल एक्स्प्रेस धावणार होती. स्थानिकांनी प्रसंगावधान राखत एक्स्प्रेसच्या चालकाला सतर्क केलं. त्यानं प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेत एक्स्प्रेसचा वेग नियंत्रणात आणला. त्यामुळे धडक टळली.

पोलीस अधीक्षक, रेल्वे पोलीस दलातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. रुळांवरुन ट्रक हटवण्यासाठी दोन तासांचा अवधी लागला. ट्रक हटवण्यात आल्यानंतर गोल्डन टेम्पल एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली. काही वेळानंतर ट्रक चालकाला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Post a Comment

0 Comments