-->

Ads

माळपठारावरील बेलोरा महसूल मंडळ दुष्काळ ग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात यावा

उपविभागीय अधिकारी यांना निवेदन शेतकरी वर्गात नाराजी


प्रतिनिधी:  राजकुमार भगत बेलोरा,पुसद

बेलोरा - पुसद तालुक्यात आठ महसूल मंडळ असून त्यापैकी चारच महसूल मंडळ हे शासनाच्या दुष्काळ ग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात आलेले असून मात्र माळपठारावरील बेलोरा महसूल मंडळ दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आलेले आहे. 

त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी असून शेतकऱ्यावर शासन अन्याय करत आहे. अगोदरच माळपठारावर सिंचनाची कुठल्याही प्रकारची सोय नसल्याने आताच्या घडीला  पावसाअभावी तुरीची पिके वाळत असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असताना आता  शासनाने बेलोरा महसूल मंडळ दुष्काळ ग्रस्त यादीतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे. 

त्यामुळे माळपठारावरील शेतकरी यांनी दिनांक २० नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांना निवेदन देऊन बेलोरा महसूल मंडळ दुष्काळ ग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात यावा असे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, अगोदरच शेतकरी वर्गात नाराजी आणि ग्रस्त झालेला आहे. माळ पठार अगोदरच दुष्काळग्रस्त असल्याने शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा नसल्याने कायमच दुष्काळ पडलेला असतो.असे असताना शासन बेलोरा महसूल मंडळ दुष्काळ ग्रस्त यादीतून वगळण्यात आले तो अन्याय दूर करून बेलोरा महसूल मंडळ मधील  बेलोरा मारवाडी बु.पिपळगाव ई, कुंभारी, आमटी, पांढुर्णा के , रोहडा,हनुमान नगर, वाघजळी,आसोला, सतरमाळ हनवतखेडा, पन्हाळा, मैसमाळ, मांजरजवळ, वसंतवाडी, रामपूर इत्यादी गावे  दुष्काळ ग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात यावीत. महसूल अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्फत महसूल मंडळातील शेतकरी यांची माहिती  घेउन योग्य तो अहवाल शासनाला पाठवून बेलोरा महसूल मंडळ दुष्काळ ग्रस्त यादीत येऊन अन्याय दूर करावा या आशयाचे निवेदन देण्यात आले.निवेदन देताना माळपठारील शेतकरी विवेकराव मस्के,संतोषभाऊ मुराई, पांडुरंग जामकर,नामदेवराव गडदे ,जांबुवंत मस्के, अरुण पुलाते, कमलसिंग राठोड, प्रा दत्ता पवार, शेषराव राठोड, विष्णु चव्हाण,विशाल ढाले, नथुजी ढाले,साहेबराव पवार, पुरासिंग राठोड,नथुजी जामकर, ,पंजाबराव मस्के,किरण चव्हाण,गणेश राठोड,साहेबराव राठोड,शंकर राठोड परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments