-->

Ads

आ.ससाणे यांना शासन आपल्या दारी कार्यक्रमस जाण्यापासून रोखले


 माहागाव प्रतिनिधी:- संजय जाधव : सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मार्गांनी आंदोलने केली जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून राजकीय नेत्यांना गावोगावी बंदी घालण्यात आली.त्या आशयाचे फलक देखील गावोगावी लावण्यात आले.असे असताना आज उमरखेड विधानसभेचे आ.नामदेव ससाणे हे राज्य सरकारने आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी वरोडी मार्गे यवतमाळ येथे जात असल्याचे येथील समाज बांधवांना कळताच त्यांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करत त्यांना अडवले व यवतमाळ येथे जाण्यापासून रोखले.मराठा समाजाचा रोष पाहून आ.नामदेव ससाणे यांना आल्या पावली मागे फिरवे लागले.यावेळी काही काळ वातावरण तापले होते.यावेळी यवतमाळ ला जणार्या वरोडी,चिल्ली फाटा,हिंगणी,शिरफुली,येथील सकल मराठा समाजाच्या वतीने यवतमाळ येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमास जाणार्या गाड्या आडवून त्यांना आल्या पावली परत पाठवले.

फुलसावंगी व काळी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय नेत्यांना गाव बंदी

मनोज पाटील जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून फुलसावंगी व काळी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार महागाव,व पोलीस स्टेशन महागाव यांना निवेदन देवून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गाव बंदीचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला.







Post a Comment

0 Comments