-->

Ads

70 टक्के कुटुंबाचे ऊस तोडणी साठी स्थलांतर माळपठारावरील विदारक वास्तव्य

सिंचन सुविधा नसल्याने स्थलांतर कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित


प्रतिनिधी राजकुमार भगत :बेलोरा : पुसद:दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे परंतु रोजगारा अभावी पुसद तालुक्यातील माळपठारावरील 70 टक्के कुटुंब मूल बाळासह दिवाळीपूर्वी रोजगाराच्या शोधात ऊस तोडणी कामगार म्हणून पश्चिम महाराष्ट्रसह पर राज्यात दरवर्षी स्थलांतरित होतात अशा स्थितीत त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित रहावे लागत आहे.
 यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून सर्व दूर परिचित आहे या जिल्ह्यातील पुसद तालुका हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा तालुका म्हणून तर परिचित आहेच पण सोबतच हा तालुका अख्ख्या महाराष्ट्रात स्थलांतरित मजुराचा तालुका म्हणूनही परिचित आहे महाराष्ट्र कर्नाटक सह अनेक राज्यात पुसद तालुक्यातील मजूर आपल्या मुलाबाळासह ऊस तोडणीच्या कामावर निघून जातात दिवाळीच्या पहिलेच माळपठारावरील 70 टक्के कुटुंब ऊस तोडणी साठी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच कर्नाटक येथे जातात आपल्यानंतर आपल्या मुलाबाळाची काय म्हणून हे मंडळी आपल्या सोबत शिकत असलेल्या लहान मुलांना सुद्धा घेऊन जातात त्यामुळे ही मुले शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहतात व पुढे ते देखील हेच काम करतात या गंभीर बाबीकडे शासन प्रशासन लोकप्रतिनिधी फारसे लक्ष देत नसल्याचा आरोप संजय मदन आडे राष्ट्रीय बंजारा परिषद विदर्भ कार्याध्यक्ष यांनी केला आहे जर माळ पठारावरील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी असते तर या कुटुंबावर व या चिमुकल्यावर ही वेळ आली नसती पण वास्तव फार भयान असल्यामुळे या परिस्थितीला जबाबदार कोण हा प्रश्न संजय आडे यांनी विचारला आहे त्यामुळे मला पठारा वरील  शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी संजय आडे यांनी केली आहे



Post a Comment

0 Comments