-->

Ads

राजासारखे जीवन जगण्यासाठी व्यक्तीने केली 4 लग्न, बांधला 14 मजली महाल, पुढे जे झालं ते....

 व्यक्तीला राजा बनण्याची एवढी हौस होती की त्याने आपल्या वडिलोपार्जित घराचे रूपांतर वाड्यात केले. त्यावर एक-दोन नव्हे तर 14 मजली घर बांधले.





    भारताच्या इतिहासात असंख्य राजे आणि सम्राटांची नावे नोंदलेली आहेत. अशा परिस्थितीत अनेक राजे त्यांच्या विचित्र छंदांसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, भारतातील राजेशाही संपून बराच काळ लोटला असला तरी आज आम्ही तुम्हाला उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्याच्या एका व्यक्तीच्या अशाच राजेशाही राहणीमानाची  कहाणी सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. या व्यक्तीला राजा बनण्याची एवढी हौस होती की त्याने आपल्या वडिलोपार्जित घराचे रूपांतर वाड्यात केले. त्यावर एक-दोन नव्हे तर 14 मजली घर बांधले.

    एवढ्या उंच इमारतीच्या बांधकामाची तक्रार आजूबाजूच्या लोकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे केली असता, प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर घराचे बांधकाम थांबवण्यात आले. मिर्झापूर जिल्ह्यातील जमालपूर विकास गटातील श्रुतिहार गावातील रहिवासी असलेल्या सियाराम पटेल यांना राजांसारखे जीवन जगण्याची आवड निर्माण झाली होती. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सियाराम पटेल यांनी वडिलोपार्जित घर हवेलीसारखे बांधण्यास सुरुवात केली. सियाराम पटेल यांनी एकामागून एक 14 मजली घर बांधले.

    वादळ आले की गावातली लोक भयभीत होतात. या इमारतीच्या आजूबाजूचे लोक घर सोडून दूर जातात.  संतोष कुमार यांनी सांगितले की, सियारामचे हे  संपूर्ण घर एका साध्या मिस्त्रीने बांधले आहे, ज्याचा पायाही कमकुवत आहे. त्यामुळे मोठे वादळ आल्यास ही इमारत कोसळल्याची भीती असल्याने आसपासची लोक त्यांची घरे सोडून दुसरीकडे स्थलांतर होत आहेत.


    सियारामने एक दोन नाही तर चार लग्न केली यातून त्यांना 6 अपत्य झाली. सध्या या घराला टाळ असून तिसऱ्या लग्नापासून झालेल्या मुलीला देखभालीचा भत्ता न दिल्याने एसडीएमच्या आदेशानंतर ही इमारत सील करण्यात आली आहे. सियाराम पटेल आता गाव सोडून सोनभद्र जिल्ह्यात राहत आहेत.

    शासकीय परवानगी न घेता बांधलेल्या 14 मजली घरामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये नेहमीच भीतीचे वातावरण असते. शेजारी रामेश्वर गोंड यांनी सांगितले की, सियाराम पटेल हे औषधाचे काम करतात. राजा प्रमाणे ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी 14 मजली इमारत तयार केली आहे.

    Post a Comment

    0 Comments