Vikhroli News: विक्रोळी विनयभंग प्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या, अटकेतील आरोपी कोण?
विक्रोळीत महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ईदच्या मिरवणुकीत महिलेची छेड काढल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आरोपींवर कारवाई करण्यासाठी स्थानिकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं. अखेर या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी पार्क साईट पोलीस स्टेशनच्या हद्दीत ईदच्या मिरवणुकीत महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती, असं सांगण्यात येत आहे. यानंतर स्थानिक नागरिक आक्रमक झाले होते. आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी स्थानिकांनी केली.
स्थानिकांनी आरोपींना अटक करण्याची मागणी करत पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं. या घटनेचा एका व्हिडिओही समोर आला होता. महिलेने विनयभंगाची तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस कामाला लागले.
पोलिसांची सहा टीम आरोपींचा शोध घेत होती, अशी माहिती पार्क साईट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर यांनी दिली. या शोध कार्यात ज्या महिला पोलिसाची छेड काढण्यात आली होती, त्या देखील सहभागी होत्या. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
0 Comments