-->

Ads

Video : धक्कादायक प्रकार ! कॅब ड्रायव्हरने केली गैरवर्तणूक अन् महिलेने चालत्या गाडीतून मारली उडी…

एका महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेत मुलीला आणायला जाताना एका महिलेसोबत कॅब ड्रायव्हरने गैरवर्तणूक केली आणि घाबरून तिने चालत्या गाडीतून उडी मारली


प्रवासादरम्यान बस, रिक्षा किंवा एखाद्या वाहनाचा उपयोग करताना आपल्या सोबत काही चुकीचं तर घडणार नाही ना ? असा प्रश्न प्रत्येक स्त्री, महिला आणि मुलींच्या मनात नेहमीच येतो. तर आता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेत मुलीला आणायला जाताना एका महिलेसोबत कॅब ड्रायव्हरने गैरवर्तणूक केली आणि घाबरून तिने चालत्या गाडीतून उडी मारली. तसेच सर्व प्रकरण सांगताना तिने एक व्हिडीओ तयार करून तो पोस्ट केला आहे.

व्हिडीओ राजस्थानची राजधानी जयपूरचा आहे. एक महिला आपल्या मुलीला शाळेतून घेऊन येण्यासाठी जात होती. शाळेत जाण्यासाठी तिने उबर (Uber) बूक केली होती. यादरम्यान महिला कॉलवर बोलण्यात व्यस्त होती. तेव्हा उबर ड्रायव्हरने (Uber driver) महिलेचा मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. हे बघून महिला थोडी घाबरली आणि तिने याचा विरोध करण्यास सुरुवात केली. तर हे पाहून ड्रायव्हरने शाब्दिक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तिने तातडीने वाहन थांबवण्याची विनंती केली. पण, वाहनचालकाने दुर्लक्ष करून गाडीचा वेग वाढवला. महिलेसोबत घडलेला धक्कादायक प्रकार एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…

चालत्या वाहनातून उडी मारण्याचा केला प्रयत्न :

महिलेने पुढे व्हिडीओत सांगितले की, वाहनचालकाने गाडीचा वेग वाढवला हे पाहून घाबरून महिला चालत्या गाडीतून बाहेर उडी मारते. हे पाहून ड्रायव्हरने आणखीन वेगात त्याची गाडी पळवली. त्यानंतर महिलेने घडलेल्या प्रकाराची तक्रार उबर कंपनीतदेखील केली आणि या घटनेचा व्हिडीओ तयार केला. श्याम सुंदर असे या ड्रायव्हरचे नाव आहे आणि त्याच्या गाडीचा नंबर (2018 Eon, RJ14 TE 5679) हा आहे; असे महिलेने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहून त्यावर बंदी आणण्याची मागणी केली आहे आणि मला या प्रकरणात सपोर्ट करा, असे सांगताना दिसते आहे. तसेच महिला व्हिडीओत हे प्रकरण सांगताना अगदीच भावूक झाली आहे.

व्हिडीओद्वारे धक्कादायक घटना सगळ्यांसमोर आणणाऱ्या महिलेचे नाव मनाली गुप्ता असे आहे. तसेच ती जयपूरची राहणारी आहे. तिने हा व्हिडीओ तिच्या @littleshasisters या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे आणि या प्रकरणाची सविस्तर माहिती कॅप्शनमध्ये लिहिली आहे. व्हिडीओ पाहून अनेक स्त्रिया महिलेच्या समर्थनात उतरल्या आहेत. काही स्त्रिया ‘आम्ही उबर ॲप अनइन्स्टॉल (uninstalled) केला’, ‘उबर ड्रायव्हरला शिक्षा व्हायला पाहिजे’; असे अनेक जण कमेंट करताना व्हिडीओखाली दिसून येत आहेत.


Post a Comment

0 Comments