-->

Ads

नाशिकमध्ये शाहरुख खानच्या चाहत्यांचा प्रताप; थिएटरमध्येच फोडले फटाके, धक्कादायक VIDEO व्हायरल

Viral video: नाशिकमध्ये शाहरुख खानच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये काय केलं पाहा…


शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटानं मागच्या काही दिवसांमध्ये एक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने नवनवीन रेकॉर्ड निर्माण केले आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ७५ कोटींची कमाई केली होती. असे असतानाही अद्याप या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. अजूनही चाहते चित्रपटगृहात गर्दी करतात. दरम्यान, अशाच काही उत्साही चाहत्यांचा प्रताप समोर आला आहे. शाहरुख खानच्या चाहत्यांनी अक्षरश: चित्रपटगृहातच फटाके फोडले आहेत, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शाहरुख खानचे चाहते त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी इतके वेडे आहेत की, ते काहीही करायला तयार असतात किंबहुना करतातही, त्यातलाच हा एक धक्कादायक प्रकार.

ही घटना शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरामधील कमलदीप थिएटरमध्ये घडली असून जवान चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या वेळी थिएटरमध्ये फटाके फोडण्यात आले. यावेळी तरुणांनी हा थिल्लरपणा केला असून यामुळे इतरही प्रेक्षकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता, तसेच मोठी दुर्घटनाही घडण्याची शक्यता होती. शाहरुख खानच्या फॅन्सचा हा अतिउत्साह पाहून पोलिसांनी कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणीच नाही तर, थिएटरमध्येही प्रेक्षकांना ज्वलनशील गोष्टी नेण्यासाठी बंदी असताना तरुणांनी ते आतमध्ये नेले कसे, असा सवाल नेटकरी करत आहेत.


हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. अशा प्रकारे थिएटरमध्ये फटाके फोडणे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते, याचाही या ठिकाणी विचार करण्यात आलेला नाही. या आधीही चाहत्यांनी वेगवेगळे प्रताप केले आहेत, त्याचेही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्हिडीओवर देत आहेत.


Post a Comment

0 Comments