-->

Ads

VIDEO: बंगळुरूमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, १२ जणांचा होरपळून मृत्यू

बंगळुरू शहरातील अट्टीबेले येथे एका फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

कर्नाटकची राजधानी बंगळुरू शहरातील अट्टीबेले येथे एका फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काहीजण जखमी झाल्याचं वृत्त आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. ही आग आता नियंत्रणात आणली आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

ही आग नेमकी कशामुळे लागली? याची माहिती अद्याप समोर आली नाही. आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. आगीच्या या घटनेनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून संवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमी झालेल्या लोकांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


“बंगळुरू शहरातील आणेकल जवळील फटाक्यांच्या दुकानात लागलेल्या आगीत १२ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून खूप दुःख झालं. मी उद्या अपघातस्थळी जाऊन पाहणी करणार आहे. मृत कामगारांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत”, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री
 सिद्धरामय्या यांनी म्हटलं.


Post a Comment

0 Comments