-->

Ads

मुंबईत भटक्या कुत्र्यांची दहशत! पवईत पोस्टमनला घेरून हल्ला, धक्कादायक VIDEO व्हायरल

Dog attack Viral video: मुंबईत पोस्टमॅनवर कुत्र्यांचा टोळीचा भयानक हल्ला


कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतं आहे. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गाडीवर जाणाऱ्यांचा पाठलाग असो, किंवा रस्त्यावरून जात असाल तरीही भटके कुत्रे हे टोळीने हल्ला करत आहे.यात आजवर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. वाघ बकरी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून जीव वाचवताना ते पडले व त्यांच्या डोक्याला मार लागला होता, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान मुंबईतील पवई येथून कुत्र्यांच्या हल्ल्याची अशीच एक घटना समोर आली आहे, या घटनेत काही भटक्या कुत्र्यायंनी पोस्टमनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. याचा व्हिडीओही सध्या व्हायरल झाला आहे.

कुत्र्यांच्या टोळीचा पोस्टमनवर हल्ला

या व्हिडिओमध्ये पाच भटके कुत्रे एका पोस्टमनला घेरून हल्ला करताना दिसत आहेत. मात्र, जवळच असलेल्या गार्डमुळे पोस्टमनचा जीव वाचला. ही घटना मुंबईतील पवई येथील व्हीनस बिल्डिंग सनसिटी कॉम्प्लेक्समधील असल्याची माहिती आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भटक्या कुत्र्यांची टोळी पोस्टमनवर कसा हल्ला करते. यानंतर पोस्टमन आपला जीव वाचवण्यासाठी गार्डच्या दिशेने धावतो. त्याचवेळी सुरक्षा रक्षक काठीने कुत्र्यांना हकलवतो आणि पोस्टमनचा जीव वाचतो. या घटनेचा व्हिडिओ मुंबई मॅटर्स नावाच्या युजरने ट्विटरवर (एक्स) शेअर केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर काही लोक संतापही व्यक्त करत आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून अनेकजण संतापले आहेत. एका युजरने लिहिले. ‘कुत्र्यांची दहशत बघून आता घराबाहेर पडायलाही भीती वाटते.’ आणखी एका यूजरने लिहिले, ‘भयानक व्हिडिओ.’ त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘महापालिकेने याकडे लक्ष द्यावे.’

संपुर्ण देशात भटक्या कुत्र्यांची दहशत

बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिसून आली आहे. नुकतेच गुजरात राज्यात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला होता. कुत्र्यांच्या या हल्ल्यात तीन वर्षांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. पायी चालत जाणे किंवा सायकल चालविणाऱ्यांना हे कुत्रे आपले लक्ष्य बनवितात.

Post a Comment

0 Comments