बस दरीत कोसळ्यानंतर स्थानिक मदतीसाठी सरसावले पण…
तामिळनाडूतील कुन्नूर येथे शनिवारी ( ३० सप्टेंबर ) भीषण अपघात झाला आहे. पर्यटकांची बस १०० फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उटीवरून बस मेट्टूपालयमला जात होती. बसमध्ये ५५ पर्यटक होते. पण, मारापलमजवळ येथे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं खोल दरीत जाऊन कोसळली. यानंतर पोलिसांनी बचावकार्याला सुरूवात केली आहे.
कोईम्बतूरचे पोलीस उपमहानिरीक्षक सरवण सुंदर म्हणाले, अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी आहेत. जखमींना कुन्नूर येथील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.
प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस १०० फूट खोल दरीत कोसळली. स्थानिक नागरिक मदतीसाठी सरसावले. पण, अंधारामुळे मदतकार्यास अडथळे निर्माण झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, बचावकार्यासह सुरूवात केली.
0 Comments