Shubman Gill : मिळालेल्या माहितीनुसार, शुभमनला ( Shubman Gill ) चेन्नईतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून त्याला तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलंय.
Shubman Gill : टीम इंडियाचा ( Team India ) स्टार प्लेअर शुभमन गिलला ( Shubman Gill ) डेंग्यूची लागण झाली आहे. यामुळे तो वर्ल्डकपमधील ( ICC Cricket World Cup ) पहिल्या सामन्यात देखील उपलब्ध नव्हता. दरम्यान आता मिळालेल्या माहितीनुसार, शुभमनला ( Shubman Gill ) चेन्नईतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून त्याला तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलंय. शुभमनच्या आरोग्याची परिस्थिती पाहता 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्यामध्ये शुभमन गिल ( Shubman Gill ) खेळणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Cricbuzz ने दिलेल्या अहवालानुसार, टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिलला ( Shubman Gill ) सोमवारी सकाळी कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावेळी तो वैद्यकीय तज्ज्ञांचं पथक त्याच्या आरोग्यावर लक्ष ठेऊन आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे डॉक्टर रिझवान खान सध्या टीमसोबत प्रवास करत असून शुभमनच्या तब्येतीवर देखील लक्ष ठेऊन आहेत.
क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, शुभमन गिलचे ( Shubman Gill ) प्लेटलेट काउंट काही काळापासून कमी आहेत. याच कारणामुळे तो टीमसोबत दिल्लीला गेला नाही. दिल्लीमध्ये वर्ल्डकप स्पर्धतील टीम इंडियाचा दुसरा सामना बुधवारी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.
प्लेटलेटची संख्या कमी असल्याने दिल्लीला न जाण्याचा सल्ला टीम मॅनेजमेंटला देण्यात आला आहे. यापूर्वी सोमवारी बीसीसीआयने ( BCCI ) एक निवेदन जारी करून गिल दिल्ली सामन्यासाठी उपलब्ध नसल्याची पुष्टी केली होती. उपचारांसाठी शुभमन चेन्नईत राहणार आहे.
शुभमन गिल अफगाणिस्तानविरुद्ध खेळू न शकल्यास टीम इंडियाला हा मोठा धक्का असणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी गिल ( Shubman Gill ) मैदानात उतरणार की नाही यावर अजून प्रश्नचिन्ह कायम आहे. 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तानादरम्यान महत्त्वाचा सामना खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे.
ईशान किशनला पुन्हा मिळणार संधी
शुभमन गिल ( Shubman Gill ) आजारी असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्य सामन्यात रोहित शर्माबरोबर ( Rohit Sharma ) विकेटकिपर-फलंदाज ईशान किशनने भारतीय डावाची सुरुवात केली. पण सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये ईशान किशनने विकेट गमावली. या सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नाही. यावेळी शुभमन गिलच्या अनुपस्थितीत पुन्हा इशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे.
0 Comments