-->

Ads

Sangli News : कपडे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू, कवठेमहांकाळमधील दुर्दैवी घटना

 Father-Son Drown in lake : कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली आहे.


Sangli News :

सांगलीच्या कवठेमहांकाळ येथून एक दु:खद बातमी समोर येत आहे. कपडे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

पाय घसरून बंडगरवाडी तलावात पडल्यामुळे राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण (वय ४८) आणि कार्तिक राजेंद्र चव्हाण (वय १८) यांचा बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी संधाकाळच्या सुमारास ही घटना घडली. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करोली टी येथील राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण आणि कार्तिक राजेंद्र चव्हाण हे घरातील धुणे धुण्यासाठी बंडगरवाडी तलाव परिसरात गेले होते. यावेळी ते पाय घसरुन पडले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सायंकाळी तलावाच्या लगत स्थानिकांना त्यांचे धुवायला आणलेले कपडे दिसले. यावरुन संशय आल्यानंतर पाहणी केली असता तलावात त्या दोघांचेही मृतदेह सापडले. तत्काळ स्थानिकांनी या दुर्घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढून रात्री १०च्या सुमारास त्यांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते.

पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. दरम्यान, बाप-लेकांचा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत आता काही सांगता येत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र बाप-लेकाच्या अचानक निधनाने संपूर्ण गावातून शोकाकूल आहे.


Post a Comment

0 Comments