Panjab News:
पंजाबच्या जालंधरमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जालंधरच्या अवतारनगरमध्ये घरातील फ्रीजचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत २ चिमुकल्यांसह एकाच घरातील पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालंधरच्या अवतार नगर येथील गल्ली क्रमांक १२ मध्ये ही घटना घडली. घरातील सर्व सदस्य क्रिकेट मॅच पाहण्यात व्यक्त होते. याचवेळी त्यांच्या घरातील फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट झाला.
अचानक स्फोट झाल्याने कॉम्प्रेसरमधील गॅस संपूर्ण घरात पसरला. या आगीच्या आणि गॅसच्या झपाट्यात कोणालाही घराबाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे 65 वर्षीय यशपाल घई, त्यांचा मुलगा, सून यांच्यासह दोन मुलींचा होरपळून मृत्यू झाला.
याबाबतची माहिती मिळताच स्थानिक अग्रिशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी घरातील लोकांना बाहेर काढले, त्यानंतर त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तीन जणांना मृत घोषित केले तर दोघांना खाजगी रुग्णालयात रेफर करण्यात आले मात्र या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सात महिन्यांपूर्वी आणलेल्या फ्रीजने सर्वांचाच जीव घेतला...
यशपाल घई, रुची, दिया, अक्षय, आणि मनशा अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. सात महिन्यांपूर्वी हा फ्रीज खरेदी केला होता. मात्र या फ्रीजच्या स्फोटाने अख्खं कुटूंबच क्षणात संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments