-->

Ads

Online Sale Scam : सेलच्या नादात लागू शकते खिशाला कात्री, ऑनलाईन शॉपिंग करताना घ्या खबरदारी

सध्या अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईट्सवर मोठे सेल सुरू आहेत. ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल आणि बिग बिलियन डे सेल या माध्यमातून खरेदी करून मोठ्या प्रमाणात बचत करण्याचा विचार कित्येकांचा आहे. मात्र, याचाच फायदा हॅकर्स आणि ठगही घेताना दिसत आहेत.


अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्याच दिसणाऱ्या फेक वेबसाईट तयार करून, त्या माध्यमातून लोकांची फसवणूक होत असल्याची कित्येक प्रकरणं समोर आली आहेत. तुमचीही अशी फसवणूक होऊ नये यासाठी काही खबरदारी घेणं गरजेचं आहे.

कशी होते फसवणूक?

स्कॅमर्स एका टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून अगदीच आकर्षक ऑफर ग्राहकांना पाठवतात. यावेळी सोबत त्यांनी एक लिंक देखील दिलेली असते. या वेबसाईटचं नाव अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा यासारखंच असतं. जेव्हा यूजर्य या वेबसाईटवर जातात, तेव्हा त्यातील मालवेअर यूजर्सच्या मोबाईलवर हल्ला करतात आणि खासगी माहिती गोळा करण्यास सुरुवात करतात.

या वेबसाईटवरुन काही ऑर्डर केल्यास यूजर्सचे पैसे तर ट्रान्सफर होतात, मात्र ते प्रॉडक्ट ग्राहकांना कधीच मिळत नाही. ग्राहकांचे पैसे तर जातातच, मात्र सोबतच त्यांचे बँकिंग डीटेल्स देखील या वेबसाईटना मिळतात.


अशी घ्या खबरदारी

  • सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे, तुम्हाला जर ऑनलाईन शॉपिंग करायची असेल, तर या कंपन्यांचे अधिकृत अ‍ॅप्स डाऊनलोड करा. अन्यथा गुगलवर सर्च करुन अधिकृत वेबसाईटवर जा.

  • तुम्हाला आलेल्या कोणत्याही संशयास्पद मेसेजमधील लिंकवर क्लिक करु नका.

  • मेसेजमधील ऑफर खरोखरच आहे का, हे त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तपासा. मेसेजमधील लिंकवर क्लिक करणे टाळा.



Post a Comment

0 Comments