Mumbai News : अवघ्या ३६ वर्षांच्या रेल्वे कर्मचाऱ्याची धावत्या लोकलसमोर उडी; कारण समजल्यानंतर सगळ्यांनाच बसला मोठा धक्का
सेक्सस्टॉर्शनच्या त्रासाला कंटाळून रेल्वे 36 वर्षीय कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माटुंगा रेल्वे स्थानकात धावत्या लोकलखाली उडी घेत कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. जीआरपीने महिलेसह तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
कोमल शर्मा नावाच्या महिलेने रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत फेसबुकवर मैत्री केली होती. व्हिडीओ कॉलदरम्यान रेल्वे कर्मचाऱ्याचे आपत्तीजनक व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. व्हिडीओ यूट्युबवर अपलोड करण्याची भीती दाखवून मयताकडून 2 लाख रूपये उकळले.
रेल्वे कर्मचाऱ्याच्या खिशातून पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. ज्यामध्ये लिहिलं होतं की, त्याने फेसबुकवर कोमल शर्मा नावाच्या महिलेशी मैत्री झाली होती. कोमलीने कर्मचाऱ्याचे व्हिडीओ कॉलिंगदरम्यान त्याचा अश्लील व्हिडिओ काढला होता. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे उकळले जात होते.
9 ऑक्टोबर रोजी पीडित व्यक्ती सकाळी 6 वाजता नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. दुपारी अचानक 3.50 च्या सुमारास व्यक्तीच्या पत्नीला माटुंगा रेल्वे पोलिसांचा फोन आला. पतीला ट्रेनने धडक दिल्याचा ते गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांना दिली. काही वेळातच पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला.
एफआयआरनुसार, पीडित व्यक्तीने महिलेने ब्लॅकमेल करूनही पैसे दिले नाहीत. पीडितेच्या कुटुंबीयांना याची कल्पना नव्हती की सेक्सटोर्शनिस्टच्या एका गटाकडून तिचा छळ केला जात आहे आणि ब्लॅकमेल केला जात आहे.
0 Comments