Mega Block on Sunday: रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबईल लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. रविवारी (२२ ऑक्टोबर) रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे ते कल्याण पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर रविवारी मध्यरात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल. या ब्लॉकदरम्यान मुंबईकडे येणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील.
याशिवाय मुंबईतून (Mumbai Mega Block) बाहेर जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील मानखुर्द ते नेरुळ अप-डाऊन मार्गावरही रविवारी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
रविवारी सकाळी ११:१५ ते सायंकाळी ४:१५ पर्यंत हा मेगाब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी, वडाळा रोड येथून वाशी, सीबीडी बेलापूर पनवेलकरिता आणि सीएसएमटी येथून वांद्रे गोरेगावकरिता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द असणार आहे.
दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावरील गोरेगाव ते बोरिवली अप-डाऊन जलद मार्गावर देखील रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा गोरेगाव ते बोरिवली स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे.
0 Comments