Danish Abrar Car Attacked: राजस्थानचे काँग्रेस आमदार दानिस अबरार यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला आहे.
राजस्थानचे काँग्रेस आमदार दानिस अबरार यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला आहे. अज्ञातांनी या हल्ल्यात त्यांच्या कारचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. राजस्थानच्या मलारना चौड सवाईमाधोपूरमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर दानिस अबरार यांनी फेसबुकवर लाईव्ह येऊन माहिती दिली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
काँग्रेस आमदार दानिस अबरार यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. फेसबुकला लाईव्ह येत त्यांनी म्हटलं की, मला काँग्रेसकडून तिकीट मिळालं आहे. मी माझ्या कुटुंबासोबत कारने प्रवास करत होतो. त्याचवेळी अज्ञातांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. तरीही मी विधानसभेला निवडणूक लढवेन आणि जिकेंन'
काँग्रेस आमदाराने म्हटलं आहे की, 'मी निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाला कारवाई करण्याची विनंती करत आहे की, या निवडणुकीत कोणत्याही उमेदवारांवर असे हल्ले व्हायला नकोत. माझी प्रशासनाला विनंती आहे की, त्यांनी गुंडावर कारवाई करावी. गेल्या दहा वर्षात झालं नाही, ते आज झालं आहे. माझी संपूर्ण कार फोडली आहे. माझ्या लोकांना मारहाण करण्यात आली आहे'.
राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या काँग्रेसच्या पहिल्या यादीत सवाई माधोपूरमधून दानिश अबरार यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं आहे. दानिश अबरार यांची लढत भाजपचे राज्यसभा खासदार किरोडलाल मीणा यांच्याशी होणार आहे. गेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने किरोडीलाल यांना तिकीट दिलं होतं.
0 Comments