-->

Ads

CCTV Footage : धावत्या 'वंदे भारत' ट्रेनमध्ये चढण्याचा जीवघेणा प्रयत्न, नंतर ज्याची भीती होती तेच झालं... पाहा VIDEO

Train Accident : आरपीएफ जवानामुळे या प्रवाशाचा थोडक्यात जीव बचावला आहे. घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.


Vande Bharat Train :

धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना प्रवाशांचा अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अनेक घटनांचे थरारक व्हिडीओ देखील समोर आले आहे. मात्र तरीही प्रवासी असे जीवघेणे प्रयत्न करतच असतात.

अशीच एक घटना समोर आली आहे. एका प्रवाशाने दरवाजे बंद असताना देखील धावत्या वंदे भारत ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. आरपीएफ जवानामुळे या प्रवाशाचा थोडक्यात जीव बचावला आहे. घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या हावडा रेल्वे स्थानकातील मंगळवारची ही घटना आहे. हावडा-पुरी वंदे भारत एक्सप्रेस हावडा रेल्वे स्टेशनवरुन रवाना झाली. त्यावेळी एक प्रवासी घाईघाईत रेल्वेच्या मागे धावत होता. उशीर झाल्याने त्याची ट्रेन सुटली होती.

प्रवाशाने जीवाची पर्वा न करता धावत्या वंदे भारत ट्रेनच्या गार्ड केबिनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा तोल गेला आणि घसरला. मात्र त्याने रेल्वेचा हँडल पकडला असल्याने तो काही अंतर फरपटत गेला. त्यावेळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असलेले आरपीएफ अधिकारी बिनोद कुमार चौधरी तातडीने त्याच्या मदतीला धावले आणि प्रवाशाचा जीव कसाबसा वाचला आहे.

प्रवाशाचा जीव वाचल्याने त्याने आरपीएफ अधिकाऱ्याचे आभार मानले. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ एका सोशल मीडियावर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

मात्र ही पहिला घटना नाही की बेजबाबदारपणा प्रवाशांच्या जीवावर बेतलाय. प्रत्येकवेळी एखादा आरपीएफ जवान तुमचा जीव वाचवायला येईलच, असं नाही. त्यामुळे असे जीवघेणे प्रकार टाळले पाहिजेत.



Post a Comment

0 Comments