-->

Ads

एक साधा सुधा पोरगा रेल्वे स्थानकावर दिसला, तरी पोलिसांना संशय, बॅग तपासताच सारे हैराण

Crime News: एक साधा सुधा मुलगा रेल्वेने जात होता. तेवढ्यात रेल्वे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी झडती घेताच नोटाच नोटा दिसल्या.



लखनऊ: उत्तर प्रदेशातील पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन येथे तपासणीदरम्यान जीआरपी आणि आरपीएफच्या पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्या बॅगमधून तब्बल १५ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. एवढी मोठी रक्कम सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे या तरुणाकडे नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे पैसे नवी दिल्लीला नेले जात होते. सध्या जीआरपी आणि आरपीएफच्या टीमने या प्रकरणाची माहिती आयकर विभागाला दिली आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय रेल्वे जंक्शनवर जीआरपी आणि आरपीएफचे जवान तपासणी करत होते. यावेळी त्यांची नजर एका संशयित तरुणावर पडली. पथकाने तरुणाच्या बॅगची झडती घेतली असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. एका सामान्य दिसणाऱ्या तरुणाची पिशवी ५०० रुपयांच्या नोटांनी भरलेली होती.

बिहारमधून नवी दिल्लीला पैसे घेऊन जात होता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमांशू असे या तरुणाचे नाव असून तो मैनपुरीचा रहिवासी आहे. बिहारमधील गया येथून पैसे घेऊन तो नवी दिल्लीला जात होता. दिल्लीला जाण्यासाठी डीडीयू जंक्शनवरून ट्रेन बदलावी लागते. मात्र, त्यापूर्वीच तो पकडला गेला होता. त्याच्या बॅगेतून १५ लाख १३ हजार रुपये सापडले आहेत. पुढील कारवाई करण्यात येत आहे.

जीआरपीचे प्रभारी निरीक्षक सुरेश कुमार सिंह यांनी सांगितले की, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७-८ वर तपासणी सुरू होती. यावेळी एक संशयित तरुण दिसला. तपासणीत त्याच्याकडून १५ लाख १३ हजार रुपये जप्त करण्यात आले. त्याच्याकडे पैशांसाठी ठोस कागदही नव्हता. ही रक्कम दोन नंबरची असल्याची भीती व्यक्त होत आहे,
जी करचुकवेगिरीसाठी घेतली जात होती.




Post a Comment

0 Comments