एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ५ नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. पीडितेच्या भावाने हा प्रकार उघडकीस आणला.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच शहापूर तालुक्यातही महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ५ नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. पीडितेच्या भावाने हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी शहापूर पोलिसांत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले असून पोलिस (Police) त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींमध्ये ४ मुले अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी अघई भागातील रहिवासी असून तिचे आई-वडील मोलमजुरी करतात.
ते दररोज सकाळी कामासाठी घरातून निघून जायचे. त्यावेळी पीडित मुलगी आणि तिचा लहान भाऊ असे दोघेच घरात असायचे. याच गोष्टीचा फायदा परिसरात राहणाऱ्या ५ मुलांनी घेतला. पीडितेचे आई-वडील मजुरीच्या कामावर निघून गेल्यानंतर आरोपी घरी यायचे.
भावाच्या नजरेसमोरच पीडितेला घरातून उचलून निर्जनस्थळी घेऊन जायचे. तिथे तिच्यावर आळीपाळीने बलात्कार (Crime News) करायचे. गेल्या महिन्याभरापासून हा प्रकार सुरू होता. दरम्यान, पीडितेच्या भावाने या संपूर्ण प्रकाराची माहिती आई-वडीलांना सांगितली.
मुलीवर अत्याचार झाल्याचं कळताच त्यांच्या पायाखालची जमीनच सकरली. आई-वडिलांनी तातडीने शहापूर पोलीस ठाणे गाठत यासंदर्भात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पाचही आरोपी फरार असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली आहे.
0 Comments