-->

Ads

शिवीगाळ करून सरपंच महिलेचा विनयभंग ; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

 महागाव - गावातील वीज समस्या दूर करण्यासाठी रस्त्यावर पडून असलेला सिमेंट खांब आणावयास गेलेल्या सरपंच महिलेस दोघांनी अश्लील शिवीगाळ करीत विनयभंग केला. ही घटना तालुक्यातील धनोडा येथे शुक्रवारी (ता.३०) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली.

या प्रकरणी संशयित विवेक मोरे (वय ३४) आणि विनोद मोरे (वय ४२) यांच्या विरोधात महागाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धनोडा येथे मागील चार दिवसांपासून विजेची समस्या भेडसावत आहे.

सरपंच महिलेशी हुज्जत घालून या दोघांनी विनयभंग केल्याचा आरोप आहे. गावकऱ्यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले. सरपंच महिलेने या घटनेची तक्रार दिल्यानंतर महागाव पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

Post a Comment

0 Comments