-->

Ads

नांदेड मृत्यू प्रकरणाची बालहक्क संरक्षण आयोगाकडून दखल; चौकशीतून दोषी निश्चित करण्याचे पोलिसांना आदेश

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झालेल्या २४ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणात १२ नवजात बालकांचाही समावेश आहे.

मुंबई : नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झालेल्या २४ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणात १२ नवजात बालकांचाही समावेश आहे. या बालमृत्यूची दखल महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी नांदेड पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून या प्रकरणाचा चौकशी अहवाल पाठवण्यात यावा, असे निर्दश दिले आहेत.

३ ऑक्टोबर रोजी आयोगाने पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवले आहे. ‘शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात औषध आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे एकाच दिवसात १२ नवजात बालकांसह २४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमांत येत आहे. सदर वृत्ताचे अवलोकन केल्यावर प्रथमदर्शनी असे दिसते की, औषधांच्या अनुपलब्धतेमुळे निष्काळजीमुळे व कर्मचाऱ्यांच्या तुटवडय़ामुळे हे मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. या अर्भकांच्या मृत्यूच्या कारणांचा त्वरित प्राथमिक तपास करून त्यासंदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल आयोगाला पाठवण्यात यावा’, असे आयोगाने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.


Post a Comment

0 Comments