प्रतिनिधी : रेखा भेगडे :तळेगाव दाभाडे :मावळ तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर हा जास्तच वाढल्याचा दिसून येत आहे दोन दिवसाआधी माऊ गावांमध्ये बिबट्या हा घराच्या अगदी 50 मीटर लांब इतका बसलेला दिसून आला त्यातच आता सांगवडे गावामध्ये देखील बिबट्या आढळून आला आहे.
तर सांगवडे येथील बिबट्याच्या दबक्या पावलांनी आलेल्या बिबट्या च्यां शिकारीच्या वेळेसचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे शिकारीसाठी शनिवारच्या मध्यरात्री सांगवडे येथील विनायक जगताप यांच्या अंगणात बिबट्याने दहशत माजवली आहे जगताप याचे पाळीव कुत्र घराबाहेरच रक्षणासाठी बसला होता त्यावेळी दबक्या पावलात बिबट्या तिथे पोहोचला आणि काही कळायच्या आतच त्याने कुत्र्याची शिकार केली या परिसरात बिबट्याचा वापर वाढलाय हे या दृश्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित झाल आहे सोबतच स्थानिक नागरिक हे बिबट्याचे दहशतीत आले असल्याचे दिसून येत आहे
0 Comments