प्रतिनिधी : राजकुमार भगत :बेलोरा पुसद: मळपाठरावरील सोयाबीन पिकावर यलो मोझॅकचा प्रादुर्भावा मुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. या व्हायरस मुळे सोयाबीन पिवळे पडून शेंगा वाळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पन्नात घट होत असल्याने शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून मोबदला व शासनाकडून मदत मिळावी येलो मोझॅक चा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राचे कृषि विभगाने सर्वक्षण करण्यात यावे मळपाठरवर सोयाबीन पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या वर्षी पेरणीच्या वेळेवर पाऊस न आल्याने पेरण्याचे कामे लाबले होते.
तसेच मध्यंतरी पाऊसाचा खंड पडल्याने सोयाबीन पिकाला जसा पाहिजे तसा माल धरला नाही पाऊसाचा अनियमितपणा व वातावरणातील बदलामुळे सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. या येलो मोझॅक व्हायरस मुळे सोयाबीन पिवळे पडून वाळत आहे. तसेच ज्या शेतातील पिकाला मालधारणा झाली त्या सोयाबीनच्या शेंगाला काळे ठिपके पडून पानगळ होत आहे.
येलो मोझॅकचा सोयाबीनच्या उत्पन्नावर मोठा परिणाम पडणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा व शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी यलो मोझॅक व्हायरसचे महसूल मंडळ निहाय सर्वक्षण करण्यात यावे तसेच पंचनामे करण्यात यावे अशी मागणी हिवळणी तलाव येथील (संजय मदन आडे राष्ट्रीय बंजारा परिषद विदर्भ कार्य अध्यक्ष) यांची मागणी आहे, हीवळणी तलाव व्हरकड, फेट्रा, मोप, शिवनी, आडगाव, कुंभारी रोहडा , बेलोरा आधी गावाचा समावेश आहे.
0 Comments