-->

Ads

ठाणे : सिलिंडर भडक्यात जखमी महिलेचा मृत्यू

साबेगाव येथे सीताबाई निवास या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका सदनिकेत सिलिंडरची गळती होऊन भडका उडाला होता.


ठाणे : दिवा येथील साबेगाव भागात ४ ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलिंडरची गळती होऊन लागलेल्या आगीच्या भडक्यात दोन जण गंभीर जखमी झाले होते. यातील प्रेरणा लांबे (४०) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

साबेगाव येथे सीताबाई निवास या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका सदनिकेत सिलिंडरची गळती होऊन भडका उडाला होता. या घटनेत प्रेरणा या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी प्रेरणा यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.


Post a Comment

0 Comments