शहरातील हद्दवाढ भागातील मुजावर काॅलनीलगतच्या वस्तीत घडली. झालेला स्फोट इतका
भीषण होता, की त्यात संबंधित घराची भिंत फुटून समोरच्या घरावर आदळली. त्यामध्ये
इमारतीचे मोठे नुकसान झाले असून, एकाच कुटुंबातील ५ जण गंभीर जखमी, तर अन्य ४ जण
किरकोळ जखमी झाले आहेत.
शरीफ मुबारक मुल्ला (वय ३६), सुलताना शरीफ मुल्ला (वय ३२), जोया शरीफ मुल्ला (वय
१०), राहत शरीफ मुल्ला (वय ७) यांच्यासह अशोक दिनकर पवार (वय ५४) सुनीता अशोक
पवार (वय ४५), दत्तात्रय बंडू खिलारे (वय ८०, सर्व रा. मुजावर कॉलनी, शांतिनगर, कराड)
अशी जखमींची नावे आहेत.
आज बुधवारी पहाटे मुजावर कॉलनी परिसरात नागरिक झोपेत असताना पाण्याच्या
टाकीजवळील शरीफ मुल्ला यांच्या इमारतीत भीषण स्फोट झाला. गॅस सिलेंडरच्या टाकीला
गळती लागल्याने हा स्फोट झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पहाटेच्या
सुमारास झालेल्या स्फोटाच्या आवाजाने कराड हद्दवाढ भागातील परिसर हादरून गेला. ज्याइमारतीत स्फोट झाला, त्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. भिंती पडल्या आहेत. तीन ते चार वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये दुचाकी गाड्यांचा समावेश आहे. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता मुल्ला कुटुंबीयांच्या घरात गॅसचे तीन सिलेंडर आढळून आलेले आहेत. मात्र, तिन्ही सिलेंडर सुरक्षित आहेत. तसेच शेगडीही सुस्थितीत आहे. त्यामुळे हा स्फोट सिलेंडरचा झाला नसावा अशी दाट शक्यता आहे. स्फोटाचे नेमके कारण पोलिसांकडून शोधले जात आहे. दरम्यान, स्फोटाच्या घटनेनंतर घटनास्थळी पुण्यातील फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. तसेच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, प्रविण जाधव यांच्यासह पोलीस दाखल होते.
0 Comments