-->

Ads

सरस्वती विद्या मंदिरात महाभोंडला उत्साहात साजरा

प्रतिनिधी रेखा भेगडे : तळेगाव दाभाडे :सरस्वती शिक्षण संस्थेचे, सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक विभाग तळेगाव दाभाडे येथे शुक्रवार दिनांक २०/१०/२०२२ रोजी  महाभोंडल्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. 


कार्यक्रमासाठी सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. सुरेश झेंड व  सौ.श्रध्दा झेंड,  उपाध्यक्ष मा. श्री. दिलीप कुलकर्णी व सौ.शिल्पा कुलकर्णी, शिक्षण समिती सदस्या मा. डॉ.सौ.ज्योतीताई चोळकर,सदस्य  श्री.विश्वास देशपांडे  महाभोंडल्यासाठी उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते देवी मातेचे व हत्तीचे पूजन करण्यात  आले.त्यानंतर सर्व विद्यार्थिनींनी भोंडल्याचा फेर धरला.शिक्षिका सौ.निलिमा ठाकूर, सौ.आशा गायकवाड, अस्मिता ढावरे यांनी भोंडल्याची गाणी म्हंटले  तसेच विद्यार्थ्यांनी दांडिया खेळण्याचा आनंद घेतला.नंतर हादग्याची खिरापत ओळखून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.


   सर्व  संस्था पदाधिकाऱ्यांनी सर्वांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. विभागाचे मुख्याध्यापक मा.श्री.गाढवे सर यांनी सर्वांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments