-->

Ads

आसोली ग्रामपंचायत येथे पाणी शुद्धीकरण यंत्राचे उद्घाटन

पंधरावा वित्त आयोग अंतर्गत निधीतून केले नियोजन

प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर : पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत आसोली येथे 15 व्या वित्त आयोगातून पाणी फिल्टर बसवण्यात आले आहे. मानवाच्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी किती आवश्यक आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. खेड्या पड्या मध्ये आजर वाढण्याचे मूळ कारण पाणी असते,बरेचसे आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. हि बाब हेरून ग्रामपंचायत ने पाणी शुद्धीकरण यंत्र बसवण्याचा निर्णय घेतला.दिनांक 20-10-2023 रोजी सकाळी 11 वाजता थाटामाटात उदघाटन करण्यात आले.


कोणताही आमदार, खासदार निधी नसतांना, राजकीय पाठबळ नसताना आसोली ग्रामपंचायत विकास करत आहे. आम्हाला निधी मिळाला तर आम्ही अधिक उत्स्फूर्तपणे कामे करू आम्ही दिलेले आश्वासने पूर्ण करण्यास मी कटिबद्ध आहे.पण निधी अभावी काम कसे करावे ??? यशवंत सुभाष कोल्हे तालुकाध्यक्ष सरपंच सेवा महासंघ पुसद.



Post a Comment

0 Comments