-->

Ads

घाटकोपरमध्ये गुजराती भाषेतील बोर्डची ठाकरे गटाकडून तोडफोड; वाद चिघळण्याची शक्यता

Mumbai News : घाटकोपर येथे उद्यानाची गुजराती नावाची पाटी ठाकरे गटानं तोडली आहे. उद्यानाला लावण्यात आलेला गुजराती बोर्ड तोडला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून बोर्डाची तोडफोड करण्यात आली आहे. या तोडफोडीमुळे मराठी गुजराती नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात मराठी (Marathi) लोकांसह भाषेचीही गळचेपी होत असल्याचे समोर येत आहे. मुलुंडमध्ये मराठी असल्याच्या कारणावरुन एका महिलेला ऑफिस भाड्याने देण्यास विरोध केल्यानंतर मीरा रोड येथे एका इमारतीमध्ये गुजराती मारवाडींना प्राधान्य अशी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर आता घाटकोपरमध्ये (Ghatkopar) एका उद्यानाला गुजरातीमध्ये (Gujarati Board) नाव दिल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सोशल मीडियावर या प्रकरणी मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या नावाची तोडफोड केली आहे.  

घाटकोपरमध्ये उद्यानाला लावण्यात आलेला गुजराती भाषेतील बोर्ड ठाकरे गटाकडून तोडण्यात आला आहे. यामुळे आता घाटकोपरमध्ये मराठी विरुद्ध गुजराती असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. घाटकोपर पूर्व येथील उद्यानाला देण्यात आलेल्या गुजराती नावाची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान चर्चा होती. या उद्यानावर मारो घाटकोपर म्हणजे माझं घाटकोपर असं गुजरातीमध्ये लिहीलेला बोर्ड लावण्यात आला होता. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई महापालिकेच्या एन वॉर्ड कार्यालयाच्या बाजूलाच हे उद्यान आहे. हे नाव काढून टाकण्यात यावं अशी मागणी सोशल मीडियावरुन होत होती.

मनसेने यासंदर्भात महापालिकेला अल्टीमेटम देखील दिला होता. मात्र त्याआधीच या नावाची तोडफोड करुन तिथे ठाकरे गटाचा जय महाराष्ट्र माझं घाटकोपर उद्धव बाळासाहेब ठाकरे असा बॅनर लावण्यात आला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीच याची तोफफोड केल्याचे समोर आलं आहे.घाटकोपर पूर्वेला पश्चिमेसोबत जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरच हे उद्यान आहे. या उद्यानाला काही वर्षांपूर्वी महापालिकेने मारु घाटकोपर, माय घाटकोपर आणि माझे घाटकोपर अशी तिन्ही नावे तिन्ही बाजूला दिली होती. मात्र मारु घाटकोपर हे नाव काढण्यात यावं अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती. मात्र हे नाव महापालिकेने काढलं नाही. पण आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याची तोडफोड केली आहे.

 

Post a Comment

0 Comments