-->

Ads

"आज भारतातील अनेक राज्यांमध्ये बाल विवाह मुक्त भारत अभियान "

 कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन ची भारतामधील सर्वात मोठी मोहीम


प्रतिनिधी: राजकुमार भगत : बेलोरा,पुसद;कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन तसेच स्व.मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा ता.पुसद जिल्हा यवतमाळ यांच्या सयुक्त विद्यमाने 16 ऑक्टोंबर 2023 रोजी बालविवाह मुक्त भारत अभियाना अंतर्गत पुसद तालुक्यातील 30 गावांमध्ये महिलांना तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंध ची शपथ देण्यात आली.या अभियानाचे ऊर्जा स्रोत नोबेल पुरस्कार विजेते मा. श्री.कैलास जी सत्यार्थी सर मा.विधान सर , राजीव भारद्वाज सर यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे नियोजन करण्यात आले होते.



स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्थे चे अध्यक्ष राजकुमार भगत यांनी महिलांना व विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी मार्गदर्शन केले. त्यांनी असे सांगितले की,आपण वाचतो, ऐकतो की समाजसेवकांनी बालविवाह रोखला. हे काम धाडसाचे व महत्त्वाचे आहेच; पण बालकाचे हित जपण्याकरिता आणखी काही करणे अपेक्षित असते. तशा कायद्यात तरतुदी आहेत.'बालविवाह प्रतिबंध कायदा' हा महत्त्वाचा आणि मुलींना संरक्षण देणारा कायदा आहे. सोप्या भाषेत या कायद्यातल्या तरतुदी सांगता या कायद्याप्रमाणे १८ वर्षांहून लहान मुलगी व २१ वर्षांहून कमी वयाचा मुलगा कायदेशीर विवाहासाठी योग्य नाही वर किंवा वधू यांच्यातील एक जरी अल्पवयीन असेल, तरी तो बालविवाह ठरतो. असा विवाह करणारी सज्ञान व्यक्ती, लग्न ठरवणारे, पार पाडणारे, हजर असलेले सर्व या कायद्यानुसार गुन्हेगार आहेत.


नुसता कायदा नाही, तर त्यामागचे सामाजिक प्रश्न समजून घेणे गरजेचे आहे. बहुतांश बालविवाहांत वधू अल्पवयीन असते. कुमारवयीन आकर्षणामुळे झालेला बालविवाह व लादलेला बालविवाह यांतील फरक ओळखून, प्रत्येक प्रकरण संवेदनशीलतेने हाताळणे गरजेचे आहे.अनेक जिल्ह्यांत रोजगारासाठी स्थलांतर होते. तेथे बालविवाह अधिक आहेत. बालविवाह झाल्यास मुलीचे नुकसान होते ती हक्कांपासून वंचित राहते तसेच मुले हिसकावणे, निरक्षरता, रोग, लवकर मातृत्व या सारखे प्रश्न उद्भवतात.बालविवाह थांबवायचे, तर हे चित्र बदलावे लागेल. यासाठी यंत्रणांनी संघटीत व समन्वयाने काम करावे लागेल. ग्रामसेवक, पोलिस पाटील व अंगणवाडी सेविका या सर्वांनी गावपातळीवर एकत्रित काम करणे आवश्यक आहे.


तसेच या अभियानामध्ये उमेद च्या महिलांचे खूप मोठे योगदान दिसून आले. त्यांनी प्रत्येक गावांमध्ये कॅन्डल मार्च रॅली काढून बालविवाह विरुद्ध शपथ देण्यात आल्या.या मध्ये रमा कांबळे,शांता खंदारे,ज्योती कांबळे,पल्लवी ताई सुळ, प्रीती अर्गुलवार, राणी कदम, प्रज्ञा मनवर,निकिता वाढवे यांनी या अभियाना मध्ये सहभाग घेतला.




Post a Comment

0 Comments