-->

Ads

मोठा आवाज, टायर फुटला अन् शिवशाहीने पेट घेतला, संपूर्ण बस जळून खाक

Beed Shivshahi Bus Got Fire: परळीतील छत्रपती शिवाजी महाजार चौकात शिवशाही बसला भीषण आग लागली. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही. बसचे टायर फुटून बसला ही आग लागली.


बीड: बीडच्या परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. लातूरहून परभणीकडे जाणारी ही बस परळी शहरात दाखल होताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली आणि यावेळी बसचे टायर फुटले आणि बसला भीषण आग लागली. या एसटीमध्ये एकूण सहा प्रवासी प्रवास करीत होते. मात्र, एसटी चालकाच्या प्रसंगावधानाने वेळीच पुढील अनर्थ टळला आहे.

लातूरहून परळीकडे निघालेल्या शिवशाही बसने परळीपर्यंतचा प्रवास हा आरामात केला. मात्र, परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येतात काहीतरी वाजल्याचा आवाज मोठा झाला. मात्र, यावेळेस या शिवशाहीच्या चालकाला आपल्याच गाडीच्या टायरचा हा आवाज असल्याचं जाणवलं. यावेळेस तात्काळ त्यांनी गाडी साईडला करत गाडीचा अंदाज घेतला, त्यावेळेस गाडीचा टायर फुटल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर या गाडीच्या टायरने पेट घेतला. मात्र, गाडीने पेट घेताच काही क्षणात पेट वाढत चालल्याने चालकाच्या समय सूचकतेमुळे या गाडीतील प्रवासी हे सुखरूप बाहेर पडले.

मात्र, या सगळ्या घटनेमध्ये शिवशाही गाडीची पूर्णपणे राख झाली आहे. मात्र, हा सगळा प्रकार घडत असताना तात्काळ आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत हा सगळा प्रकार बघत तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करत या सगळ्या गोष्टीची माहिती दिली. त्यावेळेस तात्काळ या ठिकाणी अग्निशामक दलाच्या एक गाडी पोहोचले. मात्र, आगीने रुद्र अवतार घेतल्याने ही शिवशाही बसला लागलेली आग विझवण्यासाठी तब्बल अग्निशामक दलाच्या तीन गाड्या या बोलवाव्या लागल्या काही तासानंतर या आगीवर नियंत्रण करण्यात आले. मात्र, यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याने समाधान व्यक्त केला जात आहे.

तर, दुसरीकडे या शिवशाहीला आग लागल्याने या शिवशाहीची पूर्णपणे राख झाल्याने दुःख व्यक्त केलं जात आहे. मात्र, हा प्रकार घडला कसा याचीही चौकशी करावी लागणार आहे. कारण, शिवशाही बस ही एसीच्या माध्यमातून प्रवाशांचा प्रवास सुखकर करते. मात्र, याच गाड्या जर अग्नीतांडव करत असतील तर या सुखरूप आहेत का, असाही प्रश्नचिन्ह नागरिकांनी उभा केला आहे.


Post a Comment

0 Comments