ईसापुर (तांडा)व नारळी येथील नागरिकांना रस्ते अभावी सोसत आहे त्रास .....
उमरखेड - संजय जाधव: विकास म्हटल की निधी असतो निधी शिवाय तालुक्यात कुठलेही कामे होत नाही . उमरखेड तालुक्यातील ९२ ग्रामपंचायती असून १०० च्या वर गावे आहेत . उमरखेड तालुक्याचे आमदार सताधारी भाजपचे आहे राज्यात ही व केंद्रात ही सता भाजप - शिंन्दे - पवार ची सता आहे उमरखेड तालुक्यांचा विकास दिवसे दिवस थांबत आहे कारण कोणालाही कळाले नाही . तालुक्याला शासनाकडून कोटयावधी रुपयांचा निधी मंजूर झाला पण विकास काय झाला व कुठे झाला हि चिंतणाची बाब आहे . उमरखेड - पुसद जोड डांबर रस्ता मागील पाच वर्ष होवून गेले तरी रस्ता काही दुरुस्ती झाली नाही त्याच बरोबर ग्रामीण भागात तर रस्ते कुठे आहे तेच समजत नाही कारण ग्रामीन भागात रस्ते संपूर्ण उखळून गेले डांबरीकरण संपूर्ण रस्ते तुटले व फाटले रस्ते आहे की पाऊल वाट आहे समजत नाही . उमरखेड तालुक्यात गावो गावी तिन पक्षाचे सताधारी नेते कार्यकर्ते व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य आहे पण कोणत्याही पदाधिकारी यांनी साधे निवेदन दिले नाही शासनाकडे रस्ते दुरुस्ती व विकास करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही म्हणुनच विकासाचा खोळंबा वाढला यावर कोणाचेही वचक न राहील्याने तालुकाविकासापासून वंचीत आहे . उमरखेड - पुसद हा रस्ता मागील पाच वर्षा पासून रस्ता आहे की खड्याचा रस्ता आहे कळत नाही उमरखेड - पुसद - ढाणकी - पोफाळी - मुळावा - गौळ - बंदीभाग - सुकळी - फुलसावंगी, ते इसापूर , असे जोडरस्ते आहे या रस्त्यावर संपूर्ण खडे मय रस्ते झाले अनेकाचा अपघात खड्यामुळे झाला . संपूर्ण रस्ते उखळले रस्त्यावर जागो जागी खडे पडले आहे वाहतूक व्यवस्था सुरळीत होत नसते संपूर्ण वाहतुकीची कोंडी ची समस्या वाढत असते नागरीकांना विद्यार्थ्यांना नाहक त्रास रस्त्यापायी होत असते तरी याकडे संबधीत विभाग दुर्लक्षपणा करीत आहे . शासण कोट्यावधी रुपये निधी विकास कामे व रस्ते दुरुस्ती साठी देतो पण कुठे पाणी मुरते कळत नाही . तालुक्यातला कुठला ही रस्ता धड नाही सर्वच रस्ते फाटले रस्तावर फुट दोन फुट खडे पडले तर काही ठिकाणी मोठ-मोठे खडे पडून अनेकांचा अपघात झाला तर काहीचा मुत्यू सुद्धा या रस्त्यावरिल खड्यामुळे झाला तरी शासण व प्रशासन लक्ष देत नाही संपूर्ण रस्त्यांची माती झाली तरी कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांना काही सोयरसुतक नाही सत्ताधारी सरकारला नाही व विरोधकांना नाही . उमरखेड तालुक्यात कॉंग्रेस पक्षाचे मोठ मोठे नेते आहेत पण कोणताही नेता साधे निवेदन दिले नाही किंवा जनतेच्या विकासासाठी एखादे अंदोलन कोणीही केले नाही ही बाब कॉंग्रेस पक्षाला आत्मचिंतणाची बाब आहे . निवडणुका जवळ - जवळ येत आहे तर कॉंग्रेस पक्ष विकासाचा अजेंठा का जनतेला सांगणार . भाजपचे आमदार सांगतात विकासकामांसाठी प्रचंड निधी मंजुर केला पण विकास कुठे बुडाला हे कळायला पाहीजे . तालुक्यात कोणत्याही गावाचा विकास झाला नाही संपुर्ण विकास कमीशनमध्ये अडकला यावर सताधारी सरकारने दखल घेवून उमरखेड तालुक्याचा विकासाचा फॉर्मुला आखावा देशाचे पंतप्रधान म्हणता सबका साथ , सबका विकास या विचाराने केंद्रशासन कामे करतात तसे कामे उमरखेड सताधारी आमदार यांनी गावोगावी - विकासाची गंगा राबविण्यात यावी अशी मागणी नागरीक करीत आहे .
जिल्हयाचे पालकमंत्री व जिल्हाअधिकारी यांनी तात्काळ उमरखेड तालुक्याचे रस्ते दुरुस्ती करण्यासाठी तात्काळ दखल घेणे महत्वाचे आहे.
0 Comments