रेखा भेगडे:पिंपरी चिंचवड : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या औचित्याने पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी ह्यांनी राष्ट्राला केलेल्या स्वच्छता ही सेवाअंतर्गत एक_तारीख_एक_तास या उपक्रमाच्या आवाहनाला साथ देत रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या टीम ने शेखर चिंचवडे युथ फौंडेशन, जिजाऊ सोशल फौंडेशन, जेष्ठ नागरिक संघ, श्री महालक्ष्मी बचत गट तसेच पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य विभाग, महापालिका शाळा क्रमांक 18/1 वाल्हेकरवाडी ह्यांच्या माध्यमातून वाल्हेकरवाडी चिंचवडेनगर परिसरात विविध जागी स्वछता मोहीम आज 1 ऑक्टोम्बर 2023 सकाळी 10 ते 11 या वेळेत राबवली आणि स्वछता विषयक जागृती नागरिकांच्या मध्ये केली.
अभियानाची सुरवात देशाला बलशाली बनवण्यास आणि प्रगतीपथावर नेण्यास वर्षभरात 100 तास म्हणजे आठवड्याला 2 तास सार्वजनिक परिसर स्वच्छ करण्यास मदत करेल अशी स्वछता प्रतिज्ञा घेऊन झाली.
१. संकल्प चौक ते दगडोबा चौक
२. राजयोग पेट्रोलियम ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वाल्हेकरवाडी
३. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते त्रिवेणी हॉस्पिटल चौक
0 Comments