-->

Ads

कोकणात जाणारी खासगी बस कोसळली 50 फूट खोल दरीत, 1 किलो मीटरवर सापडला चालकाचा मृतदेह

Private Bus Accident: पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावरील वरंध घाटात हा अपघात झाला आहे. यानंतर नीरा देवघर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात रात्री 2 वाजता ही धक्कादायक घटना घडली.


निलेश खरमरे, झी मीडिया, भोर: पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणा-या मिनी बसचा वरंधा घाटात भीषण अपघात झालाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं नीरा देवघर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात बस खोल दरीत कोसळली. यात चालकाचा मृत्यू झाला तर सर्व 10 प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय.बस कोसळली तिथून अवघ्या 5 फुटांवर नीरा देवघर धरणाचं खोल पाणी होत, मात्र बस झाडाझुडपात अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. स्थानिक तरुणांनी जीवाची बाजी लावून प्रवाशांचा जीव वाचवल्याचे वृत्त समोर आले आहे.

पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावरील वरंध घाटात हा अपघात झाला आहे. यानंतर नीरा देवघर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात रात्री 2 वाजता ही धक्कादायक घटना घडली. घाटामध्ये असलेल्या रस्त्यांना सुरक्षा कठडे नाहीत. रस्त्यावर नवीन येणाऱ्या चालकांना याचा अंदाज येत नाही. या कारणामुळे गेल्या काही दिवसात या रस्त्यावर अनेक अपघात झालेले दिसून येत आहे. 

हा अपघात इतका भयानक होता की मिनी बस 50 फूट खोल दरीत कोसळली.
सुदैवाने बसमधील 13 ही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. बस दरीत कोसळताना झाडाझुडपात अडकल्याने मोठा अनर्थ टळला.घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गाडीतील प्रवास्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. 

अपघातातील जखमींना भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
MH08AP1530 असा या खासगी बसचा नंबर आहे. ही मिनी बस पुण्याहून वरंध घाट मार्गे चिपळूणकडे चालली होती. घाटातील एका वळणावर चालकाचं बस वरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बस कोसळून झाडाझुडपात अडकली त्या ठिकाणाहून अवघ्या 5 फुटांवर  नीरा देवघर धरणाचं खोल पाणी आहे. स्थानिक तरुणांनी जीवाची बाजी लावून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं आहे. 


Post a Comment

0 Comments