-->

Ads

अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीच्या 35 मुलांना मारहाण, पालघरमधल्या महाविद्यालात रँगिगचा धक्कादायक प्रकार

पालघर जिल्ह्यातील एका महाविद्यालयात रँगिगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाविद्यालयातल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांनी रँगिगच्या नावाखाली दहावीच्या 35 विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली. या घटनेने एकच खळबल उडील आहे. याप्रकरणी पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 


जिल्ह्यातील एका महाविद्यालयात (College) अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावी इयत्तेतील पस्तीस विद्यार्थ्यांना शिक्षेच्या रँगिगच्या (Raging) नावावाखील जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यात एका विद्यार्थ्याचा कानाचा पडद्याला इजा झाली आहे. संतापजनक म्हणजे सहा दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराबद्दल विद्यालय प्रशासनासाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

काय आहे नेमका प्रकार?
या महाविद्यालयात बारावीपर्यंतेच वर्ग भरतात. 30 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता अकरावीतील सहा ते सात विद्यार्थ्यांनी  उदयगिरी हाऊसमध्ये दहावीच्या 35 विद्यार्थ्यांना तुम्हाला काही सूचना द्यायच्या आहे सांगत बोलावून घेतलं. सांगितल्यानुसार विद्यार्थी उदयगिरी हाऊसमध्ये दाखल झाले. पण उशीरा आलेल्या विद्यार्थ्यंना उभं राहाण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर उशीरा का आले अशी विचारणा करत विद्यार्थ्यांच्या गालावर सात ते आठ फटके मारण्यात आले. एका विद्यार्थ्याच्या गुप्तागांवर गुडघ्याने मारण्यात आल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. 

इतकंच नाही तर दहावीतली मुलं शर्ट इन करत नाही, बूट घालत नाही, तसंच मेसमध्ये मोठमोठ्याने आवाज करतात अशी कारण देत विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. नियम फक्त आम्हीच पाळायचे का? असा सवाल दहावीच्या विद्यार्थ्यांना विचारण्यात आला.  30 सप्टेंबरला रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान म्हणजे तब्बल एक तास हा प्रकार सुरु होता. महाविद्यालय प्रशासनाला याची जराही भनक नव्हती. रात्री बारानंतर सर्व विद्यार्थ्यांना हॉस्टेलवर त्यांच्या-त्यांच्या रुममध्ये पाठवण्यात आलं. घडलेला प्रकार शिक्षकांना सांगितला तर वाईट परिणाम होतील अशी धमकीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. 

विद्यार्थ्याच्या कानाला दुखापत
दुसऱ्या दिवशी मारहाण झालेल्या दहाविच्या निखिल सिंग नावाच्या विद्यार्थ्याचा कान दुखू लागल्याने त्याला विद्यालयातील नर्सकडे घेऊन जाण्या आलं. कानाला झालेला दुखापत पाहाता नर्सने मुलाच्या आई-वडीलांना बोलावून घेण्यास सांगितलं. तसंच डॉक्टरांकडून तपासणी करुन घेण्याचा सल्ला दिला. पालकांना आपल्य पाल्याया तात्काळ डॉक्टरकडे नेलं, कानाची दुखापत पाहून कोणी मारलं आहे का अशी विचारणा विद्यार्थ्याकडे केली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. कानावर सात ते आठवेळा मारल्याने कानाच्या पडद्याला इजा झाली असून कानाचा पडदा फाटण्याची शक्यताही डॉक्टरांनी वर्तवली आहे. 

अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय कानावर शस्त्रक्रिया करता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितल्याने पालकांची चिंता वाढली आहे. याशिवाय विशाल कुशवा आणइ सुशांत सोनकर यां विद्यार्थ्यांच्या गालावर आठ ते नऊ वेळा जोरजोरात मारण्यात आलं. यात विशालचा कान सुजला होता तर सुशांत सोनकर त्याच्या नाकातून रक्त येईपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली कौस्तुभ मोरे यालाही जबर मारहाण करण्यात आल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितलं.



Post a Comment

0 Comments