Viral video: विसर्जन मिरवणुकीत काकूंचा साडीत जबरदस्त डान्स होतोय व्हायरल
Viral video: देशभरात गणेश विसर्जन मिरवणुका पाडल्या. यामध्ये सर्वच स्तरातून भाविकांचा आणि जनतेचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. विसर्जन मिरवणुकीवेळी ढोल-ताशांचा आवाज ऐकताच अनेकांची पावलं थिरकतात. सोशल मीडियावर आणि विशेषत: इन्स्टाग्रामवर रिल्स खूप लवकर व्हायरल होतात. एका साडीवाल्या काकूंचे एक रिल सध्या व्हायरल होत आहे. या काकू व्हिडीओमध्ये अप्रतिम डान्स करताना दिसत आहेत.सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात, तर काही थक्क करणारे असतात. असाच एक गणपती विसर्जनादरम्यानचा हटके व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एक काकू मिरवणूकीदरम्यान भान हरपून त्याच्याचं धुंदीत नाचत आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर गणपती बाप्पांच्या अनेक मिरवणुका सुरु आहेत. यावेळी डिजे, ढोल-ताशाचे आवाज येत आहेत. यावर तरुणाईही थिरकताना दिसत आहे. दरम्यान याचवेळी एका घराच्या उंबरठ्यावर उभं राहून एक काकूही डीजेच्या तालावर तिथल्या तिथं थिरकत आहेत. हातवारे करत, वेगवेगळे एक्सप्रेशन देत या काकू नाचण्यात मग्न आहेत, त्या इतक्या भान हरपून नाचत आहेत की, तरुणाईही काकूंच्या डान्सची फॅन झाली. सुख शोधलं की मिळतं असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
काकूंच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडलाय. नेटकरी त्यांच्या डान्सकौशल्याचे कौतुक करत आहेत. या व्हिडीओला भरपूर व्ह्यूज आले असून अनेक लाइक्स मिळाले आहेत.
0 Comments