-->

Ads

VIDEO: गायीनं ८३ वर्षीय व्यक्तीला १०० मीटरपर्यंत फरफटत नेलं, लोक बघत होते पण…भीषण दुर्घटनेत वृद्धाचा मृत्यू

Viral video: रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट प्राण्यांकडून हल्ला होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. अशीच एक धक्कादायक घटना घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप उडेल.



Punjab cow Drag old man : सोशल मीडियाच्या दुनियेत कधी काय व्हायरल होईल हे कोणीच सांगू शकत नाही. यातील काही व्हिडीओ असे आहेत की, ते पाहून आपल्याला हसू येते. तर, काहींना पाहून आश्चर्यही वाटते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पंजाब राज्यातील मोहाली येथे घडलेल्या एका भयानक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एका वृद्ध व्यक्तीला गायीने तब्बल १०० मीटरपर्यंत फरफटत नेले. या घटनेत वृद्ध व्यक्तीचा जीव गेला आहे. या व्यक्तीचे वय ८३ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.स्वरूप सिंग, असे या मृत वृद्धाचे नाव आहे. गायीनं ८३ वर्षीय स्वरूप सिंग यांना १०० मीटरपर्यंत फरफटत नेल्याचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत. हा व्हिडिओ ट्विटर या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर वीणा मेहत्रा यांनी शेअर केलाय. स्वरूप सिंग त्या गायीच्या गळ्यातील दोर पकडून तिला पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी ही गाय बिधरली आणि पळू लागली. त्यावेळी सिंग यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. गायीच्या गळ्यातील दोर त्यांच्या हातात असल्यानं गायीने त्यांना १०० मीटरपर्यंत फरफटत नेलं. सिंग यांना ज्या रस्त्यावरुन गायीनं फरफटत नेलं, त्या रस्त्यावरुन वाहनं धावत होती. त्यामुळे ती गायी अधिकच गोंधळली.

गायीने फरफटत नेत असताना स्वरुप सिंह रस्त्यातील अनेक वाहनांवर आदळले. त्याचबरोबर रस्त्यातील खड्डे व दगडगोटेही त्याच्या शरीराला लागले. यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले.

रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट प्राण्यांकडून हल्ला होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. अशीच एक धक्कादायक घटना घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप उडेल.

Post a Comment

0 Comments