-->

Ads

कासवाला कमी लेखणं कुत्र्याला पडलं महागात, असा धडा शिकवला की एका क्षणात…, थरारक VIDEO पाहाच

सोशल मीडियावर प्राण्यांशी संबधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ आपणाला हसवणारे असतात तर काही थक्क करणारे असतात.


सोशल मीडियावर प्राण्यांशी संबधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ आपणाला हसवणारे असतात तर काही थक्क करणारे असतात. शिवाय काही प्राणी असे असतात जे काहीही विचार न करता इतर प्राण्यांशी पंगा घेतात आणि स्वत:च अडचणीत येतात. अनेकदा अशा प्राण्यांना वाटतं की ते खूप बलवान आहेत आणि समोरचा प्राणी कमकुवत आहेत. मात्र या चुकीच्या भ्रमामुळे त्यांना किती मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, याचं उदाहण दाखविणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका कुत्र्याला कासवाशी पंगा घेणं खूप महागात पडल्याचं पाहायला मिळत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कासवाला कमजोर समजणे, कुत्र्याला महागात पडलं आहे. कारण या व्हिडीओमध्ये एक कुत्रा कासवाशी मस्ती करताना दिसत आहे. मात्र यावेळी कासव कुत्र्याला असं काही करतो की, त्याला आपण कासवाशी पंगा का घेतला? असा प्रश्न पडला असेल यात शंका नाही. कारण हा कुत्रा कासवाला दाताने चावण्याचा प्रयत्न करतो. यावेळी सुरुवातीला कासव अतिशय शांतपणे बसून कुत्र्याच्या हालचाली पाहात बसतो आणि काही वेळाने कासवाचा संयम सुटला आणि तो क्षणात कुत्र्याची जीभ तोंडात पडकतो ज्यामुळे कुत्र्याला पश्याताप झाल्याचं पाहायला मिळत आहे.

कासवाने शिकवला कुत्र्याला धडा

कासवाने कुत्र्याची जीभ पकडताच कुत्र्याचे हात-पाय सूजू लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कुत्र्याचे हावभाव पाहून तो किती घाबरला आहे याचा अंदाज येऊ शकतो. दरम्यान, व्हिडीओमध्ये कुत्र्याचे पुढे काय झाले ते कळले नाही. मात्र, समोरच्या प्राण्याला कमकुवत समजण्याची चूक करू नये, हा धडा या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स खूप मजेदार कमेंट्सही करत आहेत. एका युजरने लिहिलं आहे, “हे खूप भीतीदायक आहे.” तर दुसऱ्या वापरकर्त्याने “कुत्र्याने लगेच फ्लॅशबॅक पाहिला असावा” असे म्हटलं आहे.


Post a Comment

0 Comments