Insect Spotted Inside Mans Ear Canal: एका व्यक्तीला गेल्या अनेक दिवसांपासून डोक्याच्या मागील बाजून तीव्र वेदना जाणवत होत्या. जेव्हा डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे केला तेव्हा जे दिसलं त पाहून डॉक्टरही हादरुन गेले.
या व्यक्तीला बर्याच काळापासून कानाच्या मागे खाज येत होती. सुरुवातीला त्याला वाटलं की कोरड्या त्वचेमुळे असे घडत असेल. पण हळूहळू त्याच्या अडचणी वाढत गेल्या. शिवाय त्याला वेदनाही होऊ लागल्या. त्याच्या कानात काही तरी चालत आहे, असे त्याला वाटत होते. जेव्हा त्रास खूप वाढला तेव्हा त्याने डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी एक्स-रे काढण्यास सांगितले, त्यात असा प्रकार दिसल्याने सर्वांनाच धक्का बसला.
एक्स-रे अहवालात माणसाच्या कानाजवळ एक किडा दिसला. तो झुरळासारखा दिसत होता. काही वेळातच जणू काही त्या किड्याने कितीतरी बाळांना सुद्धा जन्म दिला. एकामागून एक अनेक किडे एक्स-रेमध्ये दिसून आली. झुरळाने त्या व्यक्तीच्या कानाच्या केनालजवळ त्याच्या पिल्लांना जन्म दिला. जे नंतर त्या व्यक्तीच्या संपूर्ण मेंदूत पसरले. हे पाहून त्या व्यक्तीला तातडीने आपत्कालीन विभागात पाठवण्यात आले. हे पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. मानवी शरीरात एका किड्याने अनेक किड्यांना जन्म दिला, यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. एका व्यक्तीने लिहिले की, हा ५ सेकंदाचा व्हिडिओ एखाद्या हॉरर चित्रपटापेक्षा कमी नाही. तर एकाने लिहिले की हा व्हिडिओ भयंकर आहे.
0 Comments