-->

Ads

Thane Crime : ऑनलाइन चॅटिंग केलं म्हणून पतीशी भांडली, अखेर संतापलेल्या पत्नीने उचलले टोकाचं पाऊल..

पत्नी मोबाईलवरून दुसऱ्या इसमाशी चॅटिंग करत होती. मात्र पतीने त्यावर आक्षेप घेतल्याने महिला संतापली आणि तिन रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचलतं सरळ आयुष्यच....


ठाणे | 5 सप्टेंबर 2023 : पत्नी दुसऱ्या इसमाशी ऑनलाइन चॅटिंग (online chatting) करत होती. मात्र पतीला ते आवडले नाही आणि त्याने त्यावर आक्षेप घेतल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्याच रागातून पत्नीने टोकाचं पाऊल आपलं आयुष्यच संपवल्याची (crime) धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. पत्नीला आत्महत्या करण्यास उकसवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका २२ वर्षीय इसमाला, त्याच्या पत्नीला आत्महत्या करण्यास उकसवल्याच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्या पत्नीने राहत्या इमारतीतील चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला होता.

महिलेने इमारतीतून उडी मारून दिला जीव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीमध्ये हा धक्कादायक प्रकरण घडला असून याप्रकरणी करण सोळंकी याला अटक करण्यात आली. त्याची पत्नी पूजा सोळंकी हिने १ सप्टेंबर रोजी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला होता.

ऑनलाइन चॅटिंग करणारा इसमही अटकेत

पोलिसांनी सांगितले की, आरोपी पतीने त्याच्या पत्नीच्या ऑनलाइन चॅटिंगवर आक्षेप घेतला होता. त्यानंतरच तिने हे धक्कादायक पाऊल उचलले. याप्रकरणी मृत महिलेच्या आई-वडिलांनी तिचा पती तसेच ती ज्याच्याशी ऑनलाइन चॅट करत होती , त्या दोघांचेही नाव घेत, त्यामनीच मुलीला आत्महत्या करण्यास भाग पाडले, असा आरोप केला होता. पोलिसांकडे तक्रार करत त्या दोघांचीही नावे त्यांनी घेतली होती. त्याच आधारे पोलिसांनी मृत महिलेश ऑनलाइन चॅटिंग करणारा इसम गोपाश, यालाही अटक केली . गोपाळ याने मृत महिलेला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवून त्रास दिला होता, असा आरोप तिच्या पालकांनी लावला होता.



Post a Comment

0 Comments