-->

Ads

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? LPG दरकपातीनंतर आणखी एक खूशखबर मिळण्याची शक्यता

Petrol Diesel : अलीकडेच सरकारने LPGच्या किमती कपात करून मोठा दिलासा दिला आहे.


 

Rate Of Petrol Diesel :

अलीकडेच सरकारने LPGच्या किमती कपात करून मोठा दिलासा दिला आहे. आता यानंतर पेट्रोल-डिझेलची आजची किंमत कमी झाल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार दिवाळीच्या आसपास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 ते 5 रुपयांनी कपात करू शकते. यंदा नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत सरकारकडून लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

वृत्तानुसार, पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दटात दिलासा मिळाल्यास उत्पादन शुल्क किंवा व्हॅट कमी होण्याची शक्यता आहे. तथापि, रशिया आणि सौदी अरेबियाने वर्षाच्या अखेरीस तेल उत्पादनात कपात केल्यामुळे सरकारसाठी हा निर्णय कठीण होऊ शकतो. याच कारणामुळे कच्च्या तेलाने 10 महिन्यांतील उच्चांक गाठला आहे.

LPG सिलेंडर किती स्वस्त झाला?

गेल्या आठवड्यात सरकारने 14.2 किलो LPG सिलिंडरच्या किमतीत 200 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली होती. किरकोळ महागाई (Inflation) दरात वाढ होत असताना सरकारने हा निर्णय घेतला आहे. हे पाहता आता केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील, अशी अंदाज बांधली जात आहे.

डिसेंबरमध्ये राज्यात निवडणुका होणार आहेत

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अनेक राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. अहवालात असे नमूद केले आहे की ही कपात मुख्यतः उत्पादन शुल्क आणि/किंवा VAT मध्ये कपात करून होईल, कारण OMCs कच्च्या तेलाच्या सध्याच्या उच्च किंमतीमुळे तोट्यात असतील. तथापि, हे नाकारू शकत नाही की सरकार पेट्रोल/डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी OMCs ला प्रवृत्त करू शकते.


Post a Comment

0 Comments