-->

Ads

Kalyan News : सात लाख किमतीचे एमडी ड्रग्स हस्तगत; चार जणांना अटक

 Kalyan News : सात लाख किमतीचे एमडी ड्रग्स हस्तगत; चार जणांना अटक


कल्याण : कल्याणच्या कोळशेवाडी आणि खडकपाडा पोलिसांनी एमडी ड्रग्स विरोधात मोठी कारवाई केली आहे. ड्रग्स तस्कर नायजेरियन नागरिकासह दोन आरोपीना (Police) पोलिसांनी अटक केली आहे. तर (Kalyan) कल्याणजवळ आंबिवली इराणी वस्तीमधून एका महिला ड्रग्स तस्करला देखील अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाख रुपये किमतीचे तीनशे ग्रॅम एमडी ड्रग्स हस्तगत केले.

पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता या दोघांनी नवी मुंबई येथील एका नायजेरियन नागरिक चुकवूइमेका इमेका हा एमडी ड्रग्स विकत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नवी मुंबई येथे सापळा या नायजेरियन ड्रग्स तस्कराला बेड ठोकल्या. या तिघांकडून एकूण पावणे सहा लाख किमतीचे सुमारे २८५ ग्रॅम ड्रग्स जप्त केले. यानंतर खडकपाडा पोलिसांचे पथक कल्याणजवळील आंबिवली इराणी वस्ती परिसरात गस्त घालत असताना एक इराणी महिला संशयस्पद फिरताना आढळून आली. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेत झडती घेतली असता तिच्याकडे सुमारे ६६ हजार रुपये किमतीचे ३४ ग्राम वजनाचे एमडी ड्रग्स आढळून आले. फिजा इराणी असे या महिलेचे नाव असून पोलिसांनी फिजा इराणी हिला बेड्या ठोकल्यात.


Post a Comment

0 Comments