प्रतिनिधी रेखा भेगडे:तळेगाव दाभाडे :भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहराध्यक्षपदी अशोक दादाभाऊ दाभाडे यांची नियुक्ती झाली. पक्षाचे जिल्हा (उत्तर )विभागाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेपाटील यांनी दिले आहे. अशोक दाभाडे यांनी यापूर्वी तळेगाव दाभाडे भाजप कामगार आघाडीचे अध्यक्षपद तसेच सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन पद भूषविले आहे. पक्षवाढ व पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे अशोक दाभाडे यांनी निवडीनंतर सांगितले.
0 Comments