-->

Ads

जळगाव: एरंडोल तालुक्यात खासगी बस नाल्यात कोसळून दोन ठार; १२ प्रवासी जखमी

मृतांत चालकासह सहचालकाचा समावेश आहे.


जळगाव: एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी दुभाजकाला धडक दिल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी बस नाल्यात कोसळून दोन ठार, तर १२ प्रवासी जखमी झाले. मृतांत चालकासह सहचालकाचा समावेश आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

एरंडोल तालक्यातील पिंपळकोठा गावानजीक असलेल्या नाल्यात चौधरी यात्रा कंपनीची निमकथाना (राजस्थान) या जिल्ह्यातून येणारी आणि औरंगाबादकडे जाणारी शयनयान खासगी बस कोसळली. त्यात चालकासह सहचालकाचा मृत्यू, तर १२ प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू केले. एरंडोल येथील पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी येत मृतांसह जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयासह जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यास मदत केली. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी ती तातडीने सुरळीत केली.

मृतांपैकी एकाचे नाव मुकेशकुमार गुर्जर (४०, राजस्थान) असे असल्याचे समजते. दुसर्‍या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. जखमी प्रवासी मुकेश गुजर (३५), बलराम गुजर (४०), दीपेंद्रकुमार सिंग ४०), अशोक यादव (३५) यांना जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात, तर अन्य दिनेश कुमार, रतनलाल कुमावत, जयराम कुंभार, महादेव कुंभार, राजेंद्र प्रजापती, सीताराम कुमार, लक्ष्मी जांगेड अशा सात जखमींना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे


Post a Comment

0 Comments