रेखा भेगडे:तळेगाव दाभाडे : वर्षभरातील सर्व सण पर्यावरणपूरक साजरे करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दि.12/5/2020 रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशानी वर्षभरातील सर्व सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करणे आवश्यक आहे. याबाबत सदरहू मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करनेकरिता तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मा. मुख्याधिकारी एन. के. पाटील. यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेतील सक्षम अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची दि.25/8/23 रोजी बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये केंद्रशासनाचे स्वच्छ भारत अभियान व राज्यशासनाचे माझी वसुंधरा अभियान 4.0 यांची प्रभावी अंमलबजावणी करनेच्या हेतूने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पर्यावरनपूर्वक अश्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करणे, घरगुती गणेशमुर्तीची विसर्जन कृतिम तलावात करणे, त्याकरिता आवश्यक तेवढ्या कृतिम तलावाची निर्मिती करणे, सजावटीचे साहित्य, पूजेतील निर्माल्य, नैसर्गिक जलश्रोतात विसर्जित न करता निर्मल्यासाठी निर्माल्य कलश योग्य ठिकाणी बसवणे, तसेच घरोघरीचे व मंडळाचे निर्माल्य संकलित करण्यासाठी गाव व स्टेशन भागात प्रत्येकि एक निर्माल्य ट्रॅक्टर दि.20/9/23 ते दि.25/9/23 या दरम्यान व आवश्यक त्या दिवशी (दिड दिवस, पाच दिवस, सात दिवस व दहा दिवस ) उपलब्ध करून देणेची योजना करणे तसेच संकलित केलेल्या निर्मल्यातून सेंद्रिय खताची निर्मिती करणेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करणे, त्याचबरोबर सजावटीतील साहित्याची विल्हेवाट घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार शास्रोक्त पद्धतीने लावणे इत्यादी बाबत संबंधिताना निर्देश देण्यात आले.
0 Comments