-->

Ads

मुंबईत अवतरलेत कंबलवाले बाबा, अंगावर चादर टाकून रुग्णांना बरं केल्याचा दावा; भोंदूबाबाला अटक करण्याची अंनिसची मागणी

मुंबईतील घाटकोपरमध्ये राजस्थानमधून आलेल्या कंबलवाला बाबाची गेल्या चार दिवसांपासून चर्चा सुरू आहे. दिव्यांगांच्या अंगावर कंबल म्हणजे चादर पांघरून हा बाबा त्यांना बरं करत असल्याचा दावा करण्यात येत आहे.


मुंबई:  पाण्यात तरंगणारे बाबा... तव्यावर बसणारे बाबा...सरपटणारे बाबा असे अनेक बाबा आणि त्यांचे अजब कारनामे पाहिलेत.. पण सध्या मुंबईत एका कंबलवाल्या बाबाची चर्चा आहे. मुंबईतील घाटकोपरमध्ये (Ghatkopar)  राजस्थानमधून आलेल्या कंबलवाला बाबाची गेल्या चार दिवसांपासून चर्चा सुरू आहे. दिव्यांगांच्या अंगावर कंबल म्हणजे चादर पांघरून हा बाबा त्यांना बरं करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. भाजपा आमदार राम कदम या बाबाच्या उपचारांचे समर्थक आहेत. त्यामुळं विरोधकांकडून राम कदम यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप होत आहे. तसंच अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून या प्रकरणात कारवाईची मागणी करण्यात आली आहे. भोंदूबाबाला अटक करा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं मुक्ता दाभोलकर यांनी केली आहे.  

राजस्थानमधून आलेल्या कंबलवाल्या बाबांची सध्या मुंबईत चर्चा आहे. या बाबांनी दिव्यांग व्यक्तींना बरं केल्याचा दावा केला जात आहे. दिव्यांग व्यक्ती, लहान मुलं, वृद्धांच्या अंगावर कंबल म्हणजे चादर टाकून बाबाचे उपचार सध्या घाटकोपरमध्ये सुरु आहेत.  विशेष म्हणजे याच कंबलवाल्या बाबाचं कौतक स्वतः भाजप आमदार राम कदम करत आहेत.आमदार राम कदमांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर कंबलवाल्या बाबाचा जणू प्रचारच केला आहे. आमदार राम कदम या बाबाच्या उपचारांचे समर्थक आहेत. राम कदम म्हणाले, मी स्वतः विज्ञानाचा विद्यार्थी आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा मी मनात नाही मला आधी कळलं तेव्हा मला स्वतःला वाटलं होतं हे ढोंगी आहे. पण मी स्वतः कांबलवाल्या बाबांच्या कॅम्पला गेलो. माझ्या आईवडील आणि मित्रांना घेऊन गेलो त्यांना आराम मिळाला. कंबलवाल्या बाबावर गुन्हा दाखल करुन पीडित व्यक्तींची  क्रूर थट्टा थांबवावी अशी असंही आवाहन अंनिसनं केले आहे. शिवाय जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कंबलवाल्या बाबावर कारवाई करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं केली आहे.

 भोंदूबाबाला अटक करा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं मुक्ता दाभोलकर यांनी केली आहे.   मुक्ता दाभोळकर म्हणाल्या,  मला सोशल मीडियावरील एक व्हिडीओ अनेकांनी पाठवला. त्यात राजस्थानमधून आलेला कंबलवाले बाबा नावाचा बाबा आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात विकलांग लोकांवर उपचार करताना दिसत आहे.  ते लोक बरे झालेत असं दाखवलं जातंय. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने आम्ही पोलिसांना असं आवाहन करतो की, त्यांनी या कंबलवाले बाबाला तत्काळ अटक करावी. 

राम कदमांनी सांगितल्याप्रमाणे  नुसत्या अॅक्युप्रेशरनं एखाद्या दिव्यांगाला खरंच फरक पडू शकतो का? अॅक्युप्रेशरमुळे खरचं दिव्यांगातून सुटका होऊ शकतं का? जिथं डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी दिव्यांगांची वर्षे जातात. तिथं हा कंबलवाला बाबा अॅक्यूप्रेशरनं दिव्यांगांना बरं करतोय  अजब आहे. कंबलवाल्या बाबाकडे उपचार घेण्यासाठी गेल्या पाच दिवसात घाटकोपरमध्ये हजारो लोक गर्दी करतात. घाटकोपरचे आमदार राम कदम स्वतः कंबलवाल्याबाबांचं कौतुक करत असतील आणि कंबलवाल्या बाबाच्या कॅम्पेनला पोलीस अधिकारीही उपस्थित राहत असतील. तर मग कंबलवाल्या बाबावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय

Post a Comment

0 Comments